Tilari Canal  Dainik Gomantak
गोवा

Tillari Canal: ‘तिळारी’चे भगदाड बुजवणे आजपासून सुरू; गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा

Tillari Dam: कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तिळारी कालव्याला पडलेले भगदाड मोठे नाही. ते बुजवण्याचे काम उद्या, सोमवारी हाती घेतले जाणार आहे. पावसाळा असल्याने पाण्याची मागणी मोठी नाही, तरीही गोव्याकडे पुरेसा पाणीसाठा आहे. आमठणेतून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडले जात आहे, अशी माहिती जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

तिळारी कालव्याला धनगरवाडी-कुडासे (दोडामार्ग-महाराष्ट्र) येथे भगदाड पडल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे कालव्यातून होणारा पाणी पुरवठा तत्काळ बंद करावा लागला, त्यामुळे गोव्यात येणारे पाणी बंद झाले होते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी गोवा सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. कालवा फुटल्याने गोव्यात येणारे पाणी बंद झाले असल्याने त्याचा परिणाम येथील काही तालुक्यावर होईल, असे वाटत होते.

पावसाळा असल्याने पाणी बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. आमठणे धरणातून अस्नोडा प्रकल्पात पाणी सोडण्यात येत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‍भवणार नाही. परंतु तरीही उद्या, सोमवारी दुपारी सर्व अभियंत्यांना घेऊन तिळारी कालवा फुटीविषयी आढावा घेऊन पावले उचलली जातील, असे शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT