Undertaking For Bike And Car Rental Services In Goa Dainik Gomantak
गोवा

Rental In Goa: गोव्यात दुचाकी, कार रेंटवर घ्यायची आहे? चालकांना द्यावे लागणार हमीपत्र, वाहतूक खात्याचा नवा नियम

Undertaking For Rental In Goa: हमीपत्रावर दारुच्या नशेत वाहन न चालविणे, सिग्नल न तोडणे यासारख्या विविध सूचना आणि उल्लंघन न करण्याची हमी घेतली जाणार आहे.

Pramod Yadav

Undertaking For Bike And Car Rental Services In Goa

गोव्यात अपघातांना आळा घालण्यासाठी वांरवार विविध उपाययोजना केल्या जात असतात. वाहतूक विभागाने आता भाड्याने दिल्या जाणाऱ्या वाहन धारकांसाठी नवा नियम लागू केला असून, रेंट दुचाकी आणि कार मालकांना वाहन रेंटने घेणाऱ्यांकडून हमीपत्र घ्यावे लागणार आहे.

हमीपत्रावर दारुच्या नशेत वाहन न चालविणे, सिग्नल न तोडणे यासारख्या विविध सूचना आणि उल्लंघन न करण्याची हमी घेतली जाणार आहे.

गोवा वाहतूक विभागाचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली. रेंट बाईक आणि कार मालकांना आता वाहन रेंटवर घेणाऱ्यांकडून सही केलेले हमीपत्र घ्यावे लागणार आहे.

यात वाहतूक नियमांचे उल्लंघन न करण्याबाबत हमी घेण्यात येणार आहे. हमीपत्राची एक पत्र वाहन मालक आणि दुसरी पत्र वाहन भाड्याने घेणाऱ्या चालकाकडे राहणार राहणार, अशी माहिती गुप्तांनी दिली.

गोव्यात कार आणि बाईक भाड्याने घेणाऱ्यांना या हमीपत्रावर सही करावी लागणार आहे. राज्यात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

हमीपत्रात काय नमूद करण्यात आलंय?

1) मी कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही, सिग्नलचे पालन करेन

2) चालक परवान नसणाऱ्या दुसऱ्या कोणाला मी वाहन चालविण्यास देणार नाही

3) मद्य घेऊन त्याच्या नशेत मी वाहन चालवणार नाही

4) मी बाईक विना हेल्मेट आणि कार विना सिटबेल्ट चालवणार नाही

5) वाहन चालवत असताना मी मोबाईल फोनचा वापर करणार नाही

6) कारच्या सनरुफ मधून मी कोणाला उभं राहू देणार नाही

7) दुचाकीवरुन ट्रीपल सीट प्रवास करणार नाही

8) कार अथवा दुचाकीवरुन स्टंट करणार नाही, वाहन समुद्र किनाऱ्यावर घेऊन जाणार नाही.

9) वाहतूक नियमांकडे दुर्लेक्ष करुन बेदरकारपणे मी वाहन चालवणार नाही

10) वाहतूक थांब्यावर सिग्नल लाल असल्यास तोडणार नाही.

रेंटवर घेण्यात आलेली बाईक अथवा कार चालवताना मी सर्व प्रकारची काळजी घेऊन, अशी हमी देऊन वाहन भाड्याने घेणाऱ्यास सही करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT