Goa Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा जुन्या पालिका इमारतीचे नूतनीकरण डिसेंबरपर्यंत होणार

Mapusa Municipality: म्हापसा येथील पालिकेच्या आथाईद ग्रंथालय इमारतीच्या पुनर्बांधणीचे व जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, हे काम डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्हापसा येथील पालिकेच्या आथाईद ग्रंथालय इमारतीच्या पुनर्बांधणीचे व जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, हे काम डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यास्थळी म्हापसेकरांना आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

यासंदर्भात, आमदार जोशुआ डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्लास्टरिंगचे काम सुरू आहे. यावर्षी डिसेंबरच्या मध्यापर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पालिकेच्या जुन्या पालिका ग्रंथालय इमारतीची मी लवकरच पाहणी करणार आहे.

जुन्या म्हापसा नगरपालिका इमारतीच्या पुनर्बांधणीचे व जीर्णोद्धाराचे काम सध्या गोवा राज्य नागरी विकास एजन्सीद्वारे (जीसुडा) घेतले आहे. एजन्सीकडून या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या वास्तूला नवीन झळाली देण्याचे काम चालू आहे.

ई-ग्रंथालयाची व्यवस्था

काम पूर्ण झाल्यानंतर आधुनिक सुविधेसह समर्पित वाचनालय तसेच ई-ग्रंथालयाची याठिकाणी व्यवस्था असेल. तसेच, तरुण व लहान मुलांसाठी सुविधेची निर्मिती केली जाईल. हे काम पूर्ण झाल्याने ते लोकांसाठी खुले केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT