Dr. Chandrakant Shetye | Dangerous Trees in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Dangerous Trees in Bicholim: डिचोलीतील धोकादायक झाडे हटविणार; चंद्रकांत शेट्येंची माहिती

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार झाडांची पाहणी

दैनिक गोमन्तक

Dangerous Trees in Bicholim: अत्यंत धोकादायक असलेल्या डिचोली शहरातील काही झाडांवर संक्रांत येणार आहे. पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्ती टाळण्यासाठी धोकादायक झाडे तोडण्यात येणार आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यात झालेल्या प्रशासकीय बैठकीत धोकादायक झाडांचा विषय चर्चेत आला होता. धोकादायक झाडांची पाहणी करून कोसळण्याच्या अवस्थेत असलेली झाडे तोडावीत, असे निर्देशही आमदार डॉ. शेट्ये यांनी उपजिल्हाधिकारी श्री. कासकर यांना दिले होते.

मंगळवारी दुपारी वन आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पिराची कोंड आणि मांद्रेकरवाडा येथील धोकादायक झाडांची पाहणी केली. यावेळी नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर उपस्थित होत्या. पाहणीवेळी अधिकाऱ्यांना किमान आठ ते नऊ झाडे धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

पिराची कोंड येथील झाडे कापा

पिराची कोंड येथे तर काही झाडे घरांना टेकून उभी आहेत. एखादे झाड कोसळल्यास मोठी आपत्ती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या रविवारी (ता.11) बेतकी येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडे असलेल्या परिसरातील लोकही भयभीत झाले आहेत. धोकादायक झाडे कापून लोकांमधील भय दूर करावा, अशी मागणी नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT