Relocation of shops in Bicholim Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत दुकानांचे गाळ्यांत स्थलांतर

कदंबच्या आधुनिक बसस्थानक प्रकल्पाला गती मिळणार

दैनिक गोमन्तक

डिचोली: शहरातील कदंब बसस्थानकावरील दुकानांचे अखेर पर्यायी गाळ्यांत स्थलांतर सुरु झाले असून, दुकानदारांनी सध्याची दुकाने खाली करण्याचे काम हाती घेताना दुकाने खाली केली आहेत. बसस्थानकावरील दुकानांचे पर्यायी जागेत स्थलांतर झाल्यानंतर लगेचच नवीन बसस्थानक प्रकल्पाला गती मिळणार आहे. चालू आठवड्यापर्यंत सध्याचे बसस्थानक मोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. शहरातील सध्याचे बसस्थानक मोडून नवीन अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र सध्याच्या बसस्थानकावरील नऊ दुकानांचे स्थलांतर केल्याशिवाय हे बसस्थानक मोडण्याचे काम अडून राहिले आहे. गोवा राज्य साधनसुविधा मंडळातर्फे सुसज्ज असे अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे.

ऊन, पावसापासून सुरक्षा हवी

ज्या ठिकाणी गाळे बांधले आहेत, त्या ठिकाणी मात्र ऊन, पावसापासून सुरक्षा मिळावी त्यासाठी गाळ्यांच्या समोरून विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही. नवीन बसस्थानक पूर्ण होईपर्यंत याच जागेत बस थांबा असणार आहे. त्यामुळे ऊन, पावसापासून उपद्रव सहन करावा लागणार आहे, असे काही दुकानदार आणि प्रवाशांचे म्हणणे आहे.

दुकानदारांसाठी पर्यायी गाळे

सध्याच्या बसस्थानकावरील नऊ दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी बसस्थानकावरील एका कोपऱ्यात पर्यायी गाळे बांधण्यात आले आहेत. गेल्या 6 एप्रिल रोजी जीएसआयडीसी आणि कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी पाहणी करून गाळ्यांचे काम तीव्रगतीने पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले होते. त्यानंतर बांधकामाला गती देऊन गाळ्यांचे काम एकदाचे पूर्ण केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT