Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: अटक टाळण्यासाठी रामा काणकोणकरांची धडपड; अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

Goa News: गुरुवारी सायंकाळी पर्वरी पोलिस स्थानकावर श्री ब्रम्हेशानंद स्वामी यांच्या ५० ते ६० अनुयायींनी धडक दिली.

Pramod Yadav

पणजी: सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रामा काणकोणकर यांच्या विरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सूरज आरोंदेकर याच्याविरोधात पर्वरी गुन्हा नोंद झाला असून, शंकर पोळजी यांच्या विरोधात मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी काणकोणकरांनी धडपड सुरु केली असून, त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

रामा काणकोणकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. याप्रकरणी १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. काणकोणकरांचा पोलिस शोध घेत आहेत दरम्यान, त्यांचा थांगपत्ता मिळत नसल्याची माहिती आहे.

रामा काणकोणकर यांनी ब्रम्हेशानंदाचार्च स्वामी महाराज यांच्या जाणिवपूर्वक धक्का पोहोचवला असल्याची तक्रार श्याम परब आणि इतरांनी दाखल केली आहे. तसेच, पर्वरीत सूरज आरोंदेकर याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धार्मिक भावना दुखावणे तसेच, वंश आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व निर्माण केल्याच्या आरोपाखाली सूरजविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी पर्वरी पोलिस स्थानकावर श्री ब्रम्हेशानंद स्वामी यांच्या ५० ते ६० अनुयायींनी धडक दिली.

कवितेतून ब्रम्हेशानंद यांच्यावर केलेल्या भाष्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत शंकर पोळजी यांना अटक करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT