Margao religious conversion case Dainik Gomantak
गोवा

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Margao religious conversion case: धार्मिक कार्यक्रमात चुकीची माहिती देऊन नागरिकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचा दावा बजरंग दलाने केला.

Pramod Yadav

मडगाव: कारवार येथील धर्मगुरु येऊन मडगावात धर्मांतर कार्यक्रम आयोजित करत असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. मडगाव येथील पारस अपार्टमेंटमध्ये हा प्रकार सुरु असल्याचा दावा बजरंग दलाने केला, यानंतर पोलिसांनी दलाच्या कार्यकर्त्यांसोबत रविवारी घटनास्थळाची पाहणी केली.

बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये जाऊन पाहणी केली असता येथे धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून येथे धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रकार सुरु असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे.

या कार्यक्रमात चुकीची माहिती देऊन नागरिकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचा दावा बजरंग दलाने केला. 

मडगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेण्यास नकार दिला आहे. प्रत्येकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. तसेच, घटनास्थळी धार्मिक गुरु आढळून आला नाही. किंवा कोणी धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याची तक्रार केली नाही त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

दरम्यान, बजरंग दलाच्यावतीने नागरिकांना अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन धर्मांतराच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. हिंदू, ख्रिस्ती किंवा मुस्लिम नागरिकांनी कोणत्याही कारवारच्या धार्मिक गुरुच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन बजरंग दलाने केले आहे.

तसेच, राज्यात चर्च, मंदिर असताना परराज्यातील धार्मिक गुरुने रहिवासी अपार्टमेंटमध्ये अशाप्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे योग्य नसल्याचे दलाने म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ''भाजपने यादी जाहीर केल्यावरच आम्ही उमेदवार देऊ!'', ZP Electionसाठी पाटकरांचा 'वेट ॲण्ड वॉच'चा फॉर्म्युला

ना सनी, ना बॉबी... दिवंगत धर्मेंद्र यांनी बायोपिकसाठी 'या' सुपरस्टारला दिली होती पसंती; म्हणाले होते, "तो खरा सच्चा माणूस''

Goa Tourism: गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनाचा श्रीगणेशा! 'सेलिब्रिटी मिलेनियम'मधून 2000 प्रवासी दाखल

Goa Live News: 'आप'च्या कॅन्डीडेट पर्पेट मायकल डी'मेलो यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा; चर्च आणि भूमिका देवीचे घेतले आशीर्वाद

Aiden Markram Catch: मार्कराम बनला 'Superhero'! हवेत झेपावत टिपला अविश्वसनीय झेल; जडेजानं डोक्यावर मारला हात Watch Video

SCROLL FOR NEXT