Citizens along with many NGOs are also coming forward to support the flood victims Dainik Gomantak
गोवा

Goa: पूरग्रस्तांना लाडफेतील विद्यार्थ्यांसह महिला, पुरुषांकडून मदतकार्य

डिचोली - पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांसह नागरिकही पुढे सरसावत आहेत. डिचोलीतील (Bicholim) लाडफे आणि दोडामार्ग मधील महिला आणि पुरुषही सामूहिकरित्या मदतकार्यात सहभागी होत आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली - पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांसह नागरिकही पुढे सरसावत आहेत. डिचोलीतील (Bicholim) लाडफे आणि दोडामार्ग मधील महिला आणि पुरुषही सामूहिकरित्या मदतकार्यात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे लाडफे येथील विद्यार्थ्यांचा गटही मदतकार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत. "भारत माता की जय" (Bharat Mata Ki Jay) संघटनेच्या नेतृत्वाखाली लाडफे आणि दोडामार्ग येथील स्वयंसेवी नागरिकांनी पूरग्रस्त भागात मदतकार्यही केले आहे. पुराच्या तडाख्यानंतरच्या परिस्थितीचा अनुभवही विद्यार्थ्यांनी घेतला. (Relief work for flood victims from Ladfe students, women and men aam99)

साफसफाई करताना मृत बैल

लाडफे येथील सरकारी शाळेच्या (government school) विद्यार्थ्यांच्या एका गटाने मुख्याध्यापक श्रीगणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपईतील गोशाळेत मदतकार्य केले. विद्यार्थ्यांनी 'ट्रॉली' ही हातात धरली. साफसफाई करतानाच परिसरात पुरात वाहून गेलेले बॅरेल आदी वापरण्यायोग्य सामानही विद्यार्थ्यांनी गोळा केले. साफसफाई करताना गोशाळेजवळ पुरात बळी पडलेला एक बैलही या मुलांना आढळून आला. समाजासाठी आपणही काही करू शकतो. ही भावनाही मदतकार्य करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.

महिलांसह पुरुषांकडून मदतकार्य

'भारत माता की जय" संघटनेच्या बॅनरखाली लाडफे आणि दोडामार्ग येथील महिला आणि पुरुष मिळून स्वयंसेवी नागरिकांनी वेळूस भागातील काही घरांनी जावून झाडलोट आदी साफसफाई केली.निर्मल नारायण चननकर, सपनेशा सुधाकर धुरी, विमल प्रेमनाथ कोटकर, गिरीष्मा नंदा धुरी, दक्षता दत्ता मळीक, सेजल गोकुळदास लाड, गिरीष्मा सदाशिव मळीक, सिया दिलिप परब, रुची विठू मळीक, वैशाली रघुनाथ मळीक, श्रीगणेश गोपाळ गावडे, शुभांगी गणेश गावडे, सदाशिव गोविंद मळीक, संगीता सुशांत राऊत.‌

आचल अभय शिरोडकर, मनिशा संतोष आरोंदेकर, संजना संजय बेतकेकर, यशवंत भिवा मळीक, योगिता यशवंत मळीक, पल्लवी मनोज खांबल, क्रांती मितेश कुबल‌, सुभद्रा अर्जुन मेरवा, मितेश लक्ष्मण कुबल यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. मदतकार्यात युवतींही सहभागी झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT