Panaji News Dainik Gomantak
गोवा

Panaji News : लिफ्टमध्ये अडकलेल्यांची सुटका ; अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांना वाचवले

व्यथा जुन्ता हाऊसची

गोमन्तक डिजिटल टीम

जुन्ता हाऊस या सरकारी संकुलाच्या लिफ्टमध्ये गुरुवारी सकाळी दोन कामगार (सध्या रा. बेती) अडकल्याची घटना घडली. तासाभराने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. परंतु अनेक कारणांनी जुन्ता हाऊसमधील लिफ्ट चर्चेत राहिली आहे, आता आणखी एका विषयाची भर यात पडली आहे.

आषाढी एकादशी आणि बकरी ईदमुळे कार्यालयास सुटी असल्याने या इमारतीकडे कोणी फिरकत नाही. बाहेर पाऊस असल्याने परंतु वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी लिफ्टने निघालेले दोन कर्मचारी लिफ्ट बंद पडल्याने आत अडकून पडले. लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी अर्धा-पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढले.

जवानांची कसरत !

अग्निशामक दलाचे जवान संतोष भोमकर यांनी सांगितले की आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही येथे पोहोचलो. लिफ्टचा स्वीच ऑफ असल्याने वर जाऊन केबिनधील स्वीच चालू करावा लागला. तरीही लिफ्ट हलत नव्हती. लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याने अडकलेल्यांना बाहेर काढताना जवानांना कसरत करावी लागली.

वरच्या मजल्यावर राहतो कोण ?

बंद लिफ्टमधून बाहेर काढलेल्या कर्मचाऱ्यांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांनी मद्यपान केले असावे, असे स्पष्ट होते. त्यांच्या म्हणण्यानुसार इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जे राहतात, त्यांच्याकडे आम्ही जात होतो. आता या इमारतीत वरच्या मजल्यावर कोण राहतो, आणि त्यास राहण्यास कोणी परवानगी दिली, हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. सरकारी कार्यालये बंद असल्याने याबाबत कोणाला विचारणाही करता आली नाही. काही महिन्यांपूर्वी गोवा फॉरवर्डचे शिष्टमंडळ नागरी पुरवठा खात्यात निवेदन देण्यास गेले होते, तेव्हा हे शिष्टमंडळ लिफ्टमध्ये अडकून पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT