Minister Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa News: स्वतःच्या जागेमध्ये परवानगी न घेता घर बांधलंय? ३१ मार्च २०२५ पर्यंत होणार नियमितीकरण, कायदामंत्र्यांची घोषणा

Aleixo Sequeira: स्वतःच्या जागेमध्ये परवानगी न घेता बांधलेल्या घरांचे नियमितीकरण ३१ मार्च २०२५ पर्यंत केले जाईल, अशी माहिती पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आज पत्रकारांना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa House Regularisation of Unauthorised Construction Act

सासष्टी: स्वतःच्या जागेमध्ये परवानगी न घेता बांधलेल्या घरांचे नियमितीकरण ३१ मार्च २०२५ पर्यंत केले जाईल, अशी माहिती पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पत्रकारांना दिली. दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन कार्यालयातील लोकांची गाऱ्हाणी ऐकल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकारपाशी घरांचे नियमितीकरण करण्यासाठी अनेक अर्ज आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अर्ज त्वरित निकाली काढण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्याप्रमाणे जानेवारी २०२४ पर्यंत घरांच्या नियमितीकरणासाठी जे अर्ज येतील ते ३१ मार्च २०२५ पर्यंत निकालात काढले जातील, अशी माहिती मंत्री सिक्वेरा यांनी दिली.

मडगावात जिल्हा न्यायालयाची नवी इमारत बांधण्यात येत आहे. त्यासंदर्भात आपण कंत्राटदाराशी बोललो आहे व इमारतीचे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्र्वासन कंत्राटदाराने दिल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन इमारतीतील सर्व शौचालये ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

प्रकरणे निकाली काढण्यासाठी शिबिरे

उपनिबंधकांच्या कचेरीत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ती निकाली काढण्यात येतील असे सांगून मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले, की ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी शिबिरे आयोजित केली जातील व आपण स्वतः तसेच उच्च अधिकारी या शिबिरांमध्ये उपस्थित राहून ती निकाली काढली जातील.

शिबिरांना उपस्थितीचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले प्रशासन सप्ताह पाळण्याचा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन नियमित तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करीत आहे. लोकांनी या शिबिरांना उपस्थिती लावून आपल्या समस्या व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT