Private Hotel Registration  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : खासगी हॉटेल्सच्या नोंदणीचा ‘पर्यटन’ला लाभ; महसूल 1 कोटीच्यावर

Panaji News : कायदेशीर नोंदणी करण्यास भाग पाडल्याचा मोठा परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

धीरज हरमलकर

Panaji News : पणजी, पर्यटन विभागात यावर्षी खासगी हॉटेल्सच्या नोंदणीत गतवर्षीपेक्षा कमालीची वाढ झाली आहे. या खासगी हॉटेल्सच्या कायदेशीर नोंदणीमुळे महसुलात ७० टक्क्यांनी वाढ झाली असून यावर्षी महसूल १ कोटीच्यावर गेला आहे, अशी माहिती पर्यटन विभागाचे उपसंचालक राजेश काळे यांनी दिली.

वर्षानुवर्षे गोव्यात लाखो-करोडो देशी तसेच विदेशी पर्यटक येतात. येथे येणाऱ्या बहुतेक पर्यटकांना काही दिवस मुक्काम करावा लागतो. तेव्हा ते प्रामुख्याने खासगी हॉटेल्सची निवड करतात. गेल्या काही वर्षांपासून राज्यात अनेक खासगी हॉटेल्स आली; पण त्यांची कायदेशीर नोंदणी पर्यटन विभागाकडे झाली नव्हती.

यावर्षी पर्यटन विभागाने ही बाब लक्षात घेऊन गोवा, दमण आणि दीव पर्यटन व्यवसाय नोंदणी कायदा १९८२ खाली गोव्यातील सर्व खासगी हॉटेल्सना पर्यटन विभागाजवळ कायदेशीर नोंदणी करायला भाग पाडल्याने अनेक खासगी हॉटेल्सची पर्यटन विभागात नोंदणी होऊन गेल्या वर्षापेक्षा जास्त महसूलही मिळाला.

२०२२ मध्ये सुमारे ४५०० खासगी हॉटेल्सची नोंदणी झाली होती. पण जेव्हा आम्ही व्यवसाय सुलभतेची संकल्पना राबवली तेव्हा अनेक खासगी हॉटेल्सनी नोंदणी केली. खासगी हॉटेल्सच्या वाढलेल्या नोंदणीमुळे जीटीडीसीच्या महसुलातही वाढ झाल्याचे ‘जीटीडीसी’चे उत्तर गोवा उपसंचालक कुलदीप आरोलकर यांनी सांगितले.

फक्त ३ कागदपत्रांची गरज

हॉटेल्सना सुमारे १० कागदपत्रे सादर करावी लागायची आणि ही प्रक्रिया लांबलचक होती. परंतु अलीकडे आम्ही फक्त ३ कागदपत्रे मागत आहोत, ती म्हणजे मालकी दस्तऐवज, ओळख दस्तऐवज आणि जीएसटी प्रमाणपत्र तेही त्या व्यक्तीसाठी लागू असल्यास.

यावर्षी खासगी हॉटेल नोंदणीची संख्या ६५०० च्या वर गेली असून त्यामुळे जीटीडीसीच्या महसुलातही वाढ झाली आहे.

२०२१-२२ यावर्षी विभागाजवळ केवळ ३२६ हॉटेल्सची नोंद होती. यावर्षी पर्यटन विभागाने रु. ३१,९८,७०० महसूल गोळा केला. पण यावर्षी कायदेशीर हॉटेल्सची नोंदणी सक्तीची केल्यामुळे २०२२-२३ वर्षात एकूण १८६७ हॉटेल्सची नोंदणी विभागाजवळ झाली. यावर्षी या हॉटेल्सच्या नोंदणीतून रु. १,०९,३०,०६० महसूल पर्यटन विभागाला मिळाला आहे.

- राजेश काळे, पर्यटन विभागाचे उपसंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार? 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी; प्रशासन सतर्क

Goa Traffic News: पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास होणार कारवाई; 'सायलेंसर'चा आवाज करणाऱ्यांना होणार जबर शिक्षा

Advalpal: अडवलपाल कोळमवाडा येथे रस्त्याची कडा कोसळली

गोवा बीचवर बायकोशी झाला वाद, नवऱ्याने जीव द्यायला समुद्रात घेतली धाव; मदतीला आलेल्या जीवरक्षकालाही केली मारहाण

Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

SCROLL FOR NEXT