GCET 2023 Registration  Dainik Gomantak
गोवा

Goa CET 2023: अखेरच्या GCET परीक्षेसाठी नोंदणी सुरू, 'या' लिंकवरून असा करा अर्ज

Pramod Yadav

GCET 2023 Registration: तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) गोवा यांनी आजपासून म्हणजेच 10 एप्रिल 2023 पासून गोवा गोवा सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (GCET 2023) अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट goacet.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने अखेरची सामाईक प्रवेश परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे म्हटले आहे.

अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर, GCET 2023 प्रवेशपत्र उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेलवर पाठवले जाईल. GCET 2023 परीक्षा 13 आणि 14 मे 2023 रोजी गोव्यातील विविध केंद्रांवर घेतली जाईल. GCET 2023 परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल, अर्ज करण्यासाठी 2000 रूपये शुल्क भरावे लागेल. परीक्षेचा निकाल 20 मे पर्यंत लागण्याची शक्यता आहे.

असा करा अर्ज

- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट goacet.in ला भेट द्या.

- नोंदणी करा आणि पुढे जा.

- अर्ज भरल्यानंतर त्याचे पैसे भरा.

- फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या

ही प्रवेश परीक्षा असेल अखेरची

तंत्रशिक्षण संचालनालयाने अखेरची सामाईक प्रवेश परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे म्हटले आहे. 2024 पासून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी (Medical And Engineering) शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्याच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनात प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

व्यावसायिक महाविद्यालय प्रवेशासाठी यावर्षीची गोवा किमान समान प्रवेश परीक्षा 13 आणि 14 मे रोजी होणार आहे.  पुढील वर्षापासून जीसीईटी परीक्षा बंद होणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT