रविवारी गोव्यासह कोकणातही हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.  Dainik Gomantak
गोवा

गोव्यासह कोकणात आज रेड अलर्ट

मागील वर्षापेक्षा यंदा 170 मिलिमीटर जास्त पावसाची नोंद गोव्यात करण्यात आली आहे.गोव्यासह कोकणच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: मागील काहिदिवसांपासून गोव्याला (Goa) पावसाने (Monsoon) चांगलेच झोडपले असून, राज्यातील अनेक भागात पाणी शिरले आहे. कोकणच्या (Konkan) किनारपट्टी भागात देखील पावसाची (rain) जोरदार बॅटींग सुरु असल्याने तेथील रस्तांना नद्यांचे स्वरुप आले आहे. रविवारी गोव्यासह कोकणातही हवामान विभागाकडून 'रेड अलर्ट' ('Red Alert' from IMD) देण्यात आला आहे. गोव्यासह कोकणच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

आरबी समुद्रात आणि आंध्रच्या किनारपट्टीवर झालेल्या वातावरणातील बदलामुळे गोव्यात मागिल दोन आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. मागिल 24 तासांत 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज 150 ते 200 मिलीमिटर पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

गोव्यात सुरु असलेल्या सततच्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पणजी, मडगाव, सांगे, काणकोण आदी भागात जोरदार पाऊस पडत आहे. गोवा-महाराष्ट्राच्या हद्दीवर असणाऱ्या पेडणे भागात सर्वाधिक म्हणजे 190 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. गोव्यात आत्तापर्यंत एकूण 1740 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा 170 मिलिमीटर जास्त पावसाची नोंद गोव्यात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT