Goa Forward Party  Dainik Gomantak
गोवा

नगरनियोजन खात्यात जुन्या तारखेने भरती; गोवा फॉरवर्डचा सरकारवर आरोप

कवळेकरांच्या कृषी खात्यातही असाच प्रकार चालू असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) पक्षाने केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: आचारसंहिता लागू झाल्यानंतरही गोवा सरकारच्या नगरनियोजन खात्यात आपल्या मर्जीतील उमेदवारांना मागच्या तारखेने नोकरभरतीची ऑफर लेटर्स दिली जात असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने (Goa Forward Party) केला असून या खात्याचे आऊटवर्ड रजिस्टर निवडणूक आयोगाने जप्त करावे अशी मागणी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केलेल्या तक्रारीनुसार जुन्या तारखेने आऊटवर्ड नंबर टाकून ही ऑफर लेटर्स दिली जातात अशी आपल्याला खात्रीपूर्वक सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्याचे म्हटले आहे.

नगर नियोजन खाते उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्याकडे असून आचारसंहिता लागू झाल्या नंतरही त्यांच्या खात्यातील कर्मचारी मागच्या तारखेने आऊटवर्ड क्रमांक टाकून हे काम करत असल्याचा आरोप कामत यांनी केला असून त्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कवळेकरांच्या कृषी खात्यातही असाच प्रकार चालू असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) पक्षाने केला आहे. हा गोलमाल करत असताना व्हिडीओ शूट करण्यात आला असून काँग्रेस लवकरच याचा भांडाफोड करेल अशी माहिती काँग्रेसच्या काही सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT