CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Government Job: 'सरकारी नोकऱ्यांची भरती नोकर भरती आयोगाद्वारे केली जाणार' मुख्यमंत्र्यांच्या हेतूबद्दल शंका!

मुख्यमंत्र्यांच्या हेतूबद्दल शंका; आधी नियमावली बदला; मग अनुभवाची अट घाला

दैनिक गोमन्तक

मडगाव: यापुढे सरकारी नोकऱ्यांची भरती नोकर भरती आयोगाद्वारे केली जाणार, या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले गेले असले तरी सरकारी नोकरीसाठी खासगी आस्थापनात काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव गरजेचा, या घोषणेकडे काहीसे शंकेनेच पाहिले जात आहे.

(CM Pramod Sawant)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घोषणेबाबत सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन नाझारेथ यांना विचारले असता ते म्हणाले, सध्याची जी नोकर भरती नियमावली आहे ती आधी बदलावी लागेल. सध्याची जी नोकर भरती पद्धती आहे त्यात कार्यालयीन प्रशिक्षणाची तरतूद यापूर्वीच आहे. त्याशिवाय त्यांना दोन वर्षे प्रोबेशन काळ असतो.

कुठलाही कर्मचारी कामास पात्र नसल्यास त्याला या दोन वर्षांत कामावरून काढता येते. अशा सर्व गोष्टी सरकारी नोकर भरती कायद्यात समाविष्ट असताना नवीन अनुभवाची अट घालण्याची गरज काय? सरकारी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रभाकर तिंबले म्हणाले, सरकारकडे वेगवेगळ्या खात्यांत कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कित्येक अनुभवी कर्मचारी आहेत. सरकारला प्रशासन चालविण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची गरज आहे तर ते या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत का घेत नाहीत. युवकांना कमी पगारात खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा संशय आल्याशिवाय राहात नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

SCROLL FOR NEXT