Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोमंतकीयांना मिळणार ‘इस्त्रो’मध्ये संधी! विद्यापीठात सुरु होणार खास अभ्यासक्रम; कुलगुरूंनी दिली माहिती

Goa News: गोवा फॉरवर्ड शिष्टमंडळाला सोमवारी भेटीला वेळ दिली आहे. ते हिरीरीने आले त्यामुळे आजच्या मुलाखती पुढे ढकलल्या. सोमवारी त्यांना वस्तुस्थिती सांगून नंतरच भरतीच्या मुलाखती घेतल्या जातील, असे मेनन यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa University Vice-Chancellor About Recruitment Criteria And Isro Course

पणजी: गोमंतकीय उमेदवारांना डावलण्यासाठी १५ वर्षे वास्तव्य व कोकणीचे ज्ञान या अटी प्राध्यापक भरतीत शिथिल केलेल्या नाहीत. त्या विषयाचे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती गोव्यात नसल्यानेच ६ पैकी केवळ २ पदे भरण्यासाठीच या अटी सरकारच्या पूर्व परवानगीने शिथिल केल्या आहेत.

इस्त्रो’मध्ये गोमंतकीयांना संधी मिळण्यासाठी नव्याने एक अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी पातळीवर सुरू करण्यात येत असल्याचे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

विद्यापीठ कर्मचारी भरतीवेळी गोमंतकीयांना डावलण्यासाठी नियम शिथिल केले जात असल्याचा आरोप होत आहे. गोवा फॉरवर्डने गुरुवारी कुलगुरूंना याप्रश्नी घेराव घातला होता. याबाबत नेमकी स्थिती काय हे जाणून घेण्यासाठी कुलगुरूंशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गोमंतकीयांना डावलले जाते, हा आरोप चुकीच्या माहितीवर आधारून केला जातो. गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र या विषयाचे शिक्षण घेतलेले उमेदवार गोव्यात आहेत.

रिमोट सेन्सिंग हा खास विषय आहे. तो नव्याने पदव्युत्तर पदवी स्तरावर लावला जात आहे. याचे शिक्षण घेतलेला स्थानिक उमेदवार नाही. दोनदा जाहिरात देऊनही उमेदवार न मिळाल्याने विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेसमोर तो विषय मांडण्यात आला. त्यानंतर ६ पैकी केवळ २ पदे थेट भरतीने भरण्यासाठी रहिवासी दाखला व कोकणीची सक्ती हे नियम शिथिल कऱण्यासाठी सरकारची परवानगी घेण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) विद्यापीठाला २ कोटींची मदत देण्याचे कबूल केले आहे. ‘इस्त्रो’त सध्या एकही गोमंतकीय नाही. तेथे गोमंतकीयांना संधी मिळावी यासाठीच हा विषय पदव्युत्तर पदवी पातळीवर लागू केला जात आहे.

चांगले प्रकल्प, संशोधनातील सहभाग आणि चांगले शोध निबंध लिहिलेलेच उमेदवार या दोन्ही पदांसाठी निवडले जातील, असे सांगून ते म्‍हणाले, जानेवारीपर्यंत हा अभ्यासक्रम सुरू करावा लागेल. ‘इस्त्रो’चे अनेक प्रकल्प विद्यापीठाच्या सहकार्याने राबवले जातात. तेथे आमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी, अशी संकल्पना यामागे आहे.

‘गोवा फॉरवर्ड’ला वस्तुस्थिती सांगणार!

विज्ञान शाखेचा पदवीधर या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. ३५ जणांची तुकडी तयार करण्याचा विचार आहे. सध्या दोन पूर्णवेळ शिक्षक नेमल्यावर ‘इस्त्रो’कडून भेट देणारे व्याख्याते घेतले जातील. दोन वर्षांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर येथील उमेदवार सेट, नेट उत्तीर्ण होतील आणि ते शिकवण्यासाठी रुजू होतील किंवा ‘इस्त्रो’त सेवा देण्यास जातील, अशी ही योजना आहे. गोमंतकीयांचे हितच यात पाहिले गेले आहे. गोवा फॉरवर्ड शिष्टमंडळाला सोमवारी भेटीला वेळ दिली आहे. ते हिरीरीने आले त्यामुळे आजच्या मुलाखती पुढे ढकलल्या. सोमवारी त्यांना वस्तुस्थिती सांगून नंतरच भरतीच्या मुलाखती घेतल्या जातील, असे मेनन यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT