Durgadas Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa Forward Party च्या प्रयत्नांमुळेच मानवाधिकार आयोगाचे पुनर्गठन; दुर्गादास कामत यांचा दावा

मुख्य सचिवांना घेराव घालण्याचा दिला होता इशारा

दैनिक गोमंतक

Goa Forward Party: गोवा मानवाधिकार आयोग गोवा सरकारने पुन्हा गठित केल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हा आयोग बंद आहे.

तो पुन्हा कार्यरत करण्याबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानेच मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. याकडे या पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी आज लक्ष वेधले.

अध्यक्षाची कालमर्यादा संपल्याने आठ महिन्यांपूर्वी हा आयोग बंद झाला होता. सोमवारी राज्य सरकारने नव्याने या आयोगावर निवृत्त न्यायाधीश डेसमंड डिसोझा आणि न्या. प्रमोद कामत यांची नियुक्ती केली.

याबाबत बोलताना दुर्गादास कामत म्हणाले की, आम्ही मागणी केल्यामुळेच सरकारला हा आयोग पुनर्गठीत करावा लागला. हा आयोग सुरू न केल्यास आम्ही मुख्य सचिवांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता.

कामत म्हणाले की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेतही हा प्रश्न लावून धरला होता. हा आयोग चालू नसल्याने सामान्य माणसांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठीचे व्यासपीठच उपलब्ध नव्हते.

सरकारने लोकायुक्त कार्यालयाचेही अधिकार कमी केले. त्यामुळे लोकांना न्याय मागण्याचे प्राधिकरणच नाहीसे करुन टाकले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

राज्यात रामनवमीच्या सुट्टीचा मुद्दादेखील आमच्या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीच उपस्थित केला होता, आणि यावर्षी सरकारने ती सुट्टी जाहीर केली आहे, असेही दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT