RERA  Dainik Gomantak
गोवा

Real Estate: बिल्डर व्यंकटेश मोनी यांना ‘रेरा’चा दणका

Real Estate: तक्रारदारांना 4 कोटींची भरपाई देण्याचा आदेश

दैनिक गोमन्तक

Real Estate: प्रभू कन्स्ट्रक्शनचे मालक तथा बांधकाम व्यावसायिक व्यंकटेश प्रभू मोनी यांना गोवा स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने (जीआरईआरए-रेरा) मोठा दणका दिला आहे. आंगोड-म्हापसा येथील प्रभू चेंबर्स इमारतीच्या तक्रारदार युनिटधारकांना तब्बल 4 कोटींची नुकसाभरपाई देण्याचा आदेश त्‍यांना दिला आहे.

जीआरईआरएचे न्यायनिर्णयाधिकारी ॲश्‍‍ले नोरोन्हा यांच्या गेल्‍या 30 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवाड्यानुसार बिल्डर प्रभू मोनी यांना या भरपाईव्यतिरिक्त युनिटधारकांना 10 लाखांच्या खटला खर्च द्यावा लागणार आहे. रेराने जारी केलेल्या या आदेशाच्या तारखेपासून 13 दिवसांच्या आत युनिटधारकांना नुकसान भरपाई व खटल्याची रक्कम अदा न केल्यास प्रत्येक महिन्यास 10 टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

या वर्षाच्या सुरवातीला ग्रेराने युनिटधारकांना 9.3 टक्के व्याज देण्याचे आदेश दिलेत. यापूर्वी 17 मार्च 2022 रोजी, दिलेल्या आदेशानुसार व्यंकटेश मोनी यांनी तक्रारदार युनिटधारकांना 4.30 कोटी देणे बाकी असून आता बिल्डरला एकूण 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम युनिटधारकांना द्यावा लागणार आहे.

तर प्राधिकरणाचा 50 लाख रुपयांचा दंडही भरवा लागेल. दरम्‍यान, 7.5 कोटींचे कर्ज थकविल्याबाबत कॅनरा बँकेने मोनी यांची दोन कार्यालये सील केली आहेत.

नुकसान भरपाई देण्‍यास अपयश

जीआरईआरएने १७ मार्च रोजी दिलेल्या अन्य एका आदेशात मोनी यांना आदेशाच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत युनिटधारकांना नुकसान भरपाई आणि दंडासह ताबा देण्याचे निर्देश दिले होते.

पण ते अपयशी ठरल्याने हे प्रकरण वसुलीसाठी महसूल विभागाकडे पाठविले होते. महसूल विभागाला कारवाई करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने सदर प्रकरण ग्रेराच्‍या कलम ४० (२) २०१६अंतर्गत कारवाईसाठी जिल्हा न्यायाधीशांकडे वर्ग केले

आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT