Goa NCP  Dainik Gomantak News
गोवा

10 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश, गोव्यात 12 उमेदवार लढणार

काँग्रेस पक्ष हा सुधारण्याच्या पलीकडे गेला असून या पक्षात...

दैनिक गोमन्तक

मडगाव : 2012 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन गोवा विकास पार्टीच्या उमेदवारीवर नुवेतून निवडणूक जिंकणारे माजी मंत्री यांनी बरोबर 10 वर्षानंतर पुन्हा प्रवेश केला.

आज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला. पर्वरी येथील स्थानिक काँग्रेस नेते शंकर फडते यांनीही आज राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला.

राष्ट्रवादीने पाशेको यांना बाणावलीत उमेदवारी देण्याचे ठरवले असून यापूर्वी पाशेको राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर दोन वेळा बाणावलीतून निवडून आले होते.

सहा महिन्यांपूर्वी पाशेको काँग्रेस पक्षात सामील झाले होते. मात्र काँग्रेस पक्ष हा सुधारण्याच्या पलीकडे गेला असून या पक्षात राहून काही साध्य करता येणे कठीण हे समझल्यामुळेच आपण काँग्रेस (Congress) सोडली असे पाशेको यांनी सांगितले.

दरम्यान, मंत्री फिलिप नेरी रोड्रिग्स हेही लवकरच राष्ट्रवादी पक्षात सामील होणार आहेत. आणखी काही नेते लवकरच राष्ट्रवादीत सामील होणार आहेत अशी माहिती जुझे फिलिप डिसोझा यांनी दिली. आम्ही गोव्यात (goa) 12 ठिकाणी उमेदवार उभे करू असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT