marina project Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port Trust : मरिना प्रकल्पाचा पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा; मुंबई हायकोर्टात MPA ने दिली महत्त्वाची माहिती

नावशी येथे प्रकल्‍पासाठी ‘परवानगी रद्द’ मागे; खंडपीठात स्‍पष्‍टीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

marina project : मरिना प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होऊ शकेल, या आशेला आता पालवी फुटली आहे. मुरगाव बंदर प्राधिकरणाने सोमवारी नावशी येथील प्रस्तावित मरिना प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाने मागे घेतला आहे, असे गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्‍पष्‍टीकरण सादर केले.

सध्याच्या घडामोडींनुसार, एमपीएने उच्च न्यायालयात आपले मत सादर केल्यामुळे या प्रकल्पाच्या सार्वजनिक जनसुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे, जो सरकारने टाळाटाळ करत लांबवला होता. हा मरिना प्रकल्प मच्छीमारांसह स्थानिकांच्या हिताला बाधक असल्याचा दावा करणाऱ्यांच्या गदारोळानंतर प्राधिकरणाने या प्रकल्पाला स्थगिती दिली होती.

रिव्होल्युशनरी गोवन्सने न्यायालयात दावा दाखल केला होता की, कर्गवाल कन्स्ट्रक्शन्स लिमिटेडने नावशी येथे मरिना प्रकल्प प्रस्तावित केलेल्या पाण्यावर प्राधिकरणाचा अधिकार नाही. नंतर, एमपीएने बोर्डाच्या ठरावाच्या आधारे नावशी प्रकल्प तात्पुरता बाजूला ठेवला, तर झुआरीच्या दक्षिण किनाऱ्यावरील दुसऱ्या मरिना प्रकल्पाबाबत काही घडामोडी नव्हत्या.

२०११ मध्ये, मुरगाव बंदर जे आता मुरगाव बंदर प्राधिकरण आहे, त्याने दोन मरिना प्रकल्पांची निविदा काढली होती. उत्तर किनारा कर्गवालला देण्यात आला, तर दक्षिणेकडील भाग गोव्याच्या एका कंपनीला देण्यात आला.

पर्यटनाला मिळेल चालना

‘मरिना’ या संकल्पनेनुसार ती एक लहान बोटी आणि यॉट्‌स नांगरून ठेवण्यासाठी खास तयार केलेली सोय आहे. जगभरात, समुद्रकिनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना शाश्वत रोजगार प्रदान करण्यात मदत करण्यासाठी मरिना प्रकल्पांचा मोठा भाग आहे.

गोव्यातील पर्यटन तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मरिना प्रकल्प राज्याला उच्च खर्चाच्या क्षमतेसह उच्च श्रेणीतील पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT