Ravindra Bhavan
Ravindra Bhavan  Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan : स्वहितासाठीच नृत्य, संगीत वर्गांना विरोध : मोरेनो रिबेलो

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या वक्तव्यावर टिका करताना कला व सांस्कृतिक क्षेत्रातील सरकारचे अपयश उघड केले आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

खाजगी संस्थांमध्ये स्वतःचे हित असल्यानेच तालक रवींद्र भवनात संगीत, नृत्याचे वर्ग सुरु करीत नाही, हे पण उघड झाले आहे.

कला अकादमीचे काही शिक्षक खाजगीत वर्ग घेतात, असे तालक यांचे म्हणणे आहे. सरकारी कर्मचारी असे खाजगीत वर्ग घेऊ शकतात का? याची चौकशी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे तसेच गोवा मनोरंजन सोसायटीच्या चेअरमन, आमदार डिलायला लोबो यांनी करावी, अशी मागणीही रेबेलो यांनी केली आहे. रवींद्र भवनच्या संलग्न इमारतीची स्थिती काय आहे, हे स्पष्ट करावे व ही इमारत अशाच वर्गांसाठी बांधण्यात आली होती, हे लक्षात ठेवावे असेही रेबेलो याचे म्हणणे आहे.

खाजगी संस्था संगीत व नृत्य वर्गांसाठी भरपूर शुल्क आकारतात. तेव्हा रवींद्र भवनने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी हे वर्ग सुरू करावे, असे म्हणण्यात कॅप्टन विरियातो कुठे चुकले? हे तालक यांनी स्पष्ट करावे.

मडगाव व परिसरातील संगीत व नृत्य वर्ग घेणाऱ्या संस्थांची नावे तसेच त्यांचे शुल्क तालक यांनी जाहीर करावे, अशी मागणी रेबेलो यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा कॉंग्रेस मंडळाचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा, उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

पितळ उघड करणार!

रवींद्र भवन मडगाव मधील समितीचे सदस्य हे आमदार दिगंबर कामत व माजी आमदार दामू नाईक यांच्या मर्जीतले आहेत, असा आरोपही मोरेनो रेबेलो यांनी केला.

या समिती सदस्यांची कला क्षेत्रातील पात्रता स्पष्ट करावी, अशी मागणीही मोरेनो रेबेलो यांनी केली असून रवींद्र भवनच्या प्रत्येक कारभारावर आमची नजर असून ते खाजगी संस्थांचे हित जपत आहेत. त्यांचे पितळ उघड करणार, असा इशाराही रेबेलो यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: धावे सत्तरीत विहीरीत बुडून एकाचा मृत्यू!

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT