Ravi Naik New Panchayat building in Ponda Kurti Jit Arolkar Gomantak Dgital Team
गोवा

Ponda : कुर्टीत साकारणार नवीन पंचायतघर - रवी नाईक

रवी नाईक : बोर्डचे अध्यक्ष जीत आरोलकर यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : कुर्टी - खांडेपार पंचायतीसाठी नवीन पंचायतघर बांधण्यासाठी प्राथमिक कारवाईला प्रारंभ झाला आहे. कुर्टीतील हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील नियोजित जागेत हे नूतन पंचायतघर उभे राहिल.

कॉलनीतील या जागेसंबंधीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष तथा आमदार जीत आरोलकर यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आमदार तथा मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी आज खांडेपार येथील कार्यालयाला भेट देऊन सरपंच, पंचांशी संवाद साधला.

कुर्टी-खांडेपार पंचायतीचे अकरा प्रभाग असून जमिनीच्यादृष्टीने या पंचायतीचे क्षेत्रफळ फार मोठे आहे. त्यामुळे कुर्टी व खांडेपार अशा दोन ठिकाणी पंचायतीचे कार्यालय आठवड्यातील तीन दिवस चालते. दोन्ही भागातील ग्रामस्थांना पंचायतघर लांबअसल्याने अनेकांची अडचण होते, त्यामुळे नवीन पंचायतघर कामाला चालना देण्यात येईल,

असे रवी नाईक यांनी सांगितले. नूतन पंचायतघर उभारणीसाठी पंचायतीतर्फे ठराव, इतर सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून ही फाईल सरपंच संजना नाईक यांनी रवी नाईक यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य हरिष नाईक, मनिष नाईक, साजिदा सय्यद व अभिजीत गावडे, माजी सरपंच जॉन परेरा, दादी नाईक आदी उपस्थित होते.

मिनी मार्केटचीही सोय

नवीन पंचायतघरात आवश्‍यक सुविधा उपलब्ध करताना ग्रामसभा तसेच इतर कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह बांधण्यात येणार आहे. याशिवाय पंचायतघराजवळच मिनी मार्केटही उभारण्यात येणार आहे, त्यामुळे स्थानिकांची चांगली सोय होईल, असेही रवी नाईक म्हणाले.

एक हजार चौ. मी. जागेवर प्रकल्प : कुर्टी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत सरकारची सुमारे एक हजार चौरस मीटर जमीन राखून ठेवण्यात आली आहे. या जमिनीत हे पंचायतघर उभारण्यात येईल, त्यामुळे कुर्टी व खांडेपार भागातील लोकांना मध्यवर्ती ठिकाणी हे पंचायतघर होईल,

त्यामुळे गैरसोय दूर होणार असल्याचे पंचायत मंडळाने सांगितले. वीज समस्या दूर करण्यासाठी वीज खात्याला पंचायतीत वास्तू उपलब्ध करण्यात आली असून कनिष्ठ अभियंत्यासाठी त्या ठिकाणी सोय केल्याचे सरपंच संजना नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT