Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राजीनाम्याबद्दल प्रदेशाध्यक्षांशी बोलणे? छे! छे!! रवी नाईकांनी दिला अफवांना पूर्णविराम

Ravi Naik: प्रदेशाध्यक्ष दामू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि आपण द्यायला नकार दिला अशा प्रकारचे जे वृत्त काही माध्यमांतून प्रसिद्ध झाले ते विपर्यास करणारे आहे, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

Sameer Panditrao

फोंडा: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि आपण द्यायला नकार दिला अशा प्रकारचे जे वृत्त काही माध्यमांतून (गोमन्तक नव्हे) प्रसिद्ध झाले ते वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे, असे मंत्री रवी नाईक यांनी सांगितले. मंत्रिपद किंवा मंत्रिपदाचा राजीनामा याबाबतीत प्रदेशाध्यक्षांशी आपली काहीही बातचीत झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री होतो तसेच सध्याच्या मंत्रिमंडळात एक जेष्ठ मंत्री म्हणून कार्यरत आहे, त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक आपल्याला भेटायला आले होते असे ते म्हणाले. फोंडा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासंबंधी आमच्यात प्रामुख्याने बोलणी झाली.

दामू नाईक प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर व्यक्तिगत भेट झाली नव्हती याचा उल्लेख करून त्यामुळेच ते भेटायला आले, असेही ते म्हणाले. प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याच सरकारातील मंत्र्यांला भेटणे यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला.

बात का बतंगड!

या भेटीचा उगाच काहींनी ‘बात का बतंगड’ केला आहे असे ते म्हणाले. एक मात्र खरे रवी - दामूंच्या काल फोंड्यात झालेल्या या भेटीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. पण रवींनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने अफवांचे खंडन करून सबकुछ ‘नॉर्मल’ असल्याचे दाखवून दिले आहे.

काहींनी (गोमन्तक नव्हे) मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा झाल्याचे म्हटले आहे. तेही सपशेल चुकीचे आहे. माझा पक्ष बळकट करण्यास मी फिरू शकत नाही का? एखाद्या नेत्याला मी भेटलो तर त्याचे कारण मी सांगितलेच पाहिजे, असे नाही. प्रदेशाध्यक्षाने राज्यभर प्रवास करत राहिले पाहिजे. कार्यालयात बसून संघटना चालवता येत नाही. मी रोखठोक काय ते सांगतो. आता एक नंतर एक, असे मी करत नाही.
दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT