Ratan Tata RIP Dainik Gomantak
गोवा

Ratan Tata Dog Pet: रतन टाटांचा सदैव सोबती ‘गोवा’, Humans Of Bombay च्या CEO नी सांगितलेली आठवण!

Ratan Tata Passess Away: टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती रतन टाटा यांचे श्वान आपल्या सर्वांनाच माहितीच आहे. रतन टाटांनी याआधीही इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.

Manish Jadhav

Ratan Tata Goa Dog Name Story Humans Of Bombay

मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती रतन टाटा यांचे श्वान आपल्या सर्वांनाच माहितीच आहे. रतन टाटांनी याआधीही इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते 'गोवा' आणि इतर श्वानांसोबत दिसत होते. होय, गोवा म्हटल्यावर तुम्ही चकित झालात ना... गोवा हे नाव रतन टाटा यांच्या पाळीव श्वानाचं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये आपल्या पाळीव श्वानाचे नाव गोवा का ठेवलं याचा खुलासा केला होता.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्यांनी लिहिले होते की, ''बॉम्बे हाऊसमधील श्वानांसोबतचा आनंदी क्षण.. विशेषतः गोवा, माझा ऑफिस पार्टनर...'' टाटा ग्रुपचे ग्लोबल हेडक्वार्टर म्हणजेच बॉम्बे हाउसचा काही भाग रस्त्यावरील कुत्र्यांसाठी तयार केला आहे.

दरम्यान, रतन टाटा (Ratan Tata) यांच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. 'गोवा' सोबतच्या फोटोवर एका यूजरने त्यांना विचारले होते की, या श्वानाचे नाव गोवा असं कशावरुन ठेवण्यात आलं?

यूजरच्या प्रश्नाला उत्तर देताना रतन टाटांनी लिहिले होते की, ''हे कुत्र्याचे पिल्लू लहान होते तेव्हा इकडे तिकडे फिरत होते. त्यानंतर ते माझ्या सहकाऱ्याच्या गाडीत येऊन बसले आणि त्यानंतर बॉम्बे हाऊसपर्यंत येऊन थांबले. हा कुत्रा गोव्यावरुन आमच्या सोबत आला होता. म्हणून त्याचे नाव 'गोवा' ठेवले.''

रतन टाटा आणि गोवा यांच्यातील स्नेह

फोटो ब्लॉग ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या संस्थापक आणि सीईओ करिश्मा मेहता यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी रतन टाटा आणि गोवा यांच्यातील स्नेहाचा उल्लेख केला होता.

मेहता एकदा मुलाखत घेण्यासाठी रतन टाटा यांच्या मुंबईतील (Mumbai) कार्यालयात पोहोचल्या होत्या. तेव्हा तिथे 'गोवा' ला पाहून त्या थोड्या थबकल्या होत्या. मेहता यांच्या लिंक्डइन पोस्टनुसार, त्या रतन टाटा यांच्या भेटीची पाहत असताना त्यांनी त्यांच्या शेजारच्या एका खुर्चीवर गोवा बसलेला पाहिला होता.

मेहता यांनी पुढे सांगितले की, श्वानांसोबत रतन टाटा तसाच संवाद साधतात जस की, प्रत्येक व्यक्तीशी. गोवाला त्या म्हणाल्या की, गोवा मी तुला घाबरली आहे, त्यामुळे चांगल्या मुलाप्रमाणे शांत बस. तुम्हाला विश्वास बसणार नाही मी जेवढ्या वेळ रतन टाटा यांच्यासोबत होते तेवढ्या वेळेपर्यंत गोवाने माझ्याकडे पाहिलंही नाही.''

टाटा समूहाची जबाबदारी

रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतात प्रथमच संपूर्णपणे तयार केलेल्या कारचे उत्पादन सुरु करण्याचे श्रेयही त्यांना जाते. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या पहिल्या कारचे नाव 'टाटा इंडिका' होते. जगातील सर्वात स्वस्त कार 'टाटा नॅनो' बनवण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने लँड रोव्हर आणि जग्वार खरेदी करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT