Cleanliness Campaign  Dainik Gomantak
गोवा

Cleanliness Campaign : कालापूर येथे स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद

Cleanliness Campaign : यावेळी पतंजली योग समितीचे पणजी प्रभारी रवी पाटील तसेच दत्तप्रसाद भोसले यांनी उपस्थितांना योगासने आणि ध्यानधारणा याविषयी माहिती दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cleanliness Campaign :

पणजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कालापूर विभागातर्फे रुग्णाश्रय परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबविली.

रुग्णाश्रयाच्या परिसरातील झाडे-झुडपे व कचरा हटवण्यात आला. शांतादुर्गा साप्ताहिक मिलन आणि वाठारेश्वर मंदिर शाखेतील स्वयंसेवक यात सहभागी झाले होते. रुग्णाश्रयाच्या प्रमुख डॉ. शशिकला सहकारी यांनी या मोहिमेबद्दल संघ स्वयंसेवकांचे आभार मानले.

आंतरराष्ट्रीय योग दिनी शुक्रवारी सकाळी कालापूर येथील रवळनाथ ब्रह्म वाठारेश्वर मंदिरात विशेष शिबिराचे आयोजन रा. स्व. संघाच्या कालापूर विभागातर्फे करण्यात आले.

यावेळी पतंजली योग समितीचे पणजी प्रभारी रवी पाटील तसेच दत्तप्रसाद भोसले यांनी उपस्थितांना योगासने आणि ध्यानधारणा याविषयी माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी व स्वयंसेवक उपस्थित होते. संघाचे पणजी विभाग प्रमुख प्रसाद सांबारी यांची विशेष उपस्थिती होती. उमेश नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT