Rashmi Desai And Anand Kanekar Dainik Gomantak
गोवा

Sanquelim-Ponda Municipal Council: साखळी नगराध्‍यक्षपदी रश्मी देसाई बिनविरोध

उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची निवड

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanquelim-Ponda Municipal Council: साखळीच्या नगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रश्मी देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी आनंद काणेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. या पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे.

तर, फोंडा पालिकेत सत्ताधारी गटाकडून नगराध्यक्षपदासाठी रितेश नाईक आणि उपनगराध्यक्षपदासाठी दीपा कोलवेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. बहुमतामुळे त्यांची मंगळवारी होणारी निवड निश्‍चित मानली जाते.

साखळी पालिकेत धर्मेश सगलानी यांचा पराभव करून ‘जायंट किलर’ ठरलेल्या रश्मी देसाई यांची नगराध्‍यक्षपदी वर्णी लागल्याचे आज स्पष्ट झाले.

महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी देसाई यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदासाठी आनंद काणेकर यांचा एकमेव अर्ज झाल्याने तेही बिनविरोध निवडून आले.

फोंड्यामध्ये आज निवड प्रक्रिया

फोंडा पालिकेमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष रितेश नाईक तर उपनगराध्यक्षपदासाठी दीपा कोलवेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

तर, ‘रायझिंग फोंडा’ पॅनलतर्फे अनुक्रमे शिवानंद सावंत आणि वेदिका वळवईकर यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्‍यामुळे उद्या, मंगळवारी निवडणूक होणार आहे. सध्या सत्ताधारी भाजपपुरस्कृत पॅनलकडे बहुमत आहे. 15 पैकी 10 जागा त्यांनी जिंकल्या आहेत. तर, ‘रायझिंग फोंडा’ गटाकडे 4 आणि 1 अपक्ष असे 5 नगरसेवक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT