Sexual Assault in Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Sexual Assault: लग्नाच्या भुलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पणजीतील युवकास अटक

म्हापसा पोलिसांची कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा

Mapusa Sexual Assault: म्हापशातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भुलथापा देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी 17 वर्षांची आहे. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडीत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पीडीत मुलीने पोटात दुखत असल्याचे घरात सांगितले होते. तिला वारंवार पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले.

तेव्हा डॉक्टरांच्या तपासणीत संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. याबाबत मुलीच्या आईला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. जानेवारीमध्ये मोहम्मद सादिक मुल्ला (वय 26) या पणजीतील युवकाने पीडीत मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.

दरम्यान, आता पीडीत मुलीच्या आईने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी संशयित मोहम्मद सादिक मुल्ला याला अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी संशयित मोहम्मद मुल्ला याच्याविरोधात कलम 376 आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT