BJP VS Congress Dainik Gomantak
गोवा

गोवा सभापती निवड: आलेक्स सिक्वेरांविरुद्ध रमेश तवडकरांचे पारडे जड

भाजपकडे पुरेसे संख्याबळ

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात इतर कामकाज होणार नसले तरी सभापतींची निवड तसेच विश्‍वासदर्शक ठराव आणि अर्थसंकल्पाची मांडणी होणार आहे. सभापती पदासाठी काँग्रेसचे आलेक्स सिक्वेरा आणि भाजपचे रमेश तवडकर यांच्यात लढत असली तरी तवडकरांचे पारडे जड आहे, कारण भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे.

विधानसभेच्या पहिल्याच दिवशी 29 रोजी होत असलेल्या सभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री रमेश तवडकर यांना रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे कॉंग्रेसनेही सभापतिपदाची निवडणूक लढवण्याचे ठरवले असून माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे सभापती निवडणुकीत तवडकर विरुद्ध सिक्वेरा अशी लढत होणार, हे आज निश्‍चित झाले.

विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या 20 आमदारांसह तीन अपक्ष आणि मगो पक्षाच्या दोन आमदारांच्या मदतीने 25 आकडा गाठला आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांचा उमेदवारी अर्ज आज विधानसभा सचिव नम्रता उलमन यांच्याकडे सादर करण्यात आला. कॉंग्रेसने काल (शनिवारी) आपला उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे सभापती पदासाठी निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले होते.

याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, सभापति पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी नाव सुचवले असून सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी त्यांना अनुमोदन दिले आहे. त्यांचाच दुसरा अर्जही भरला असून सुभाष शिरोडकर यांनी त्यांचे नाव सुचवले असून आलेक्स रेजिनाल्ड यांनी अनुमोदन दिले आहे. तवडकर यांचा तिसरा अर्ज भरला असून जेनिफर मोन्सेरात यांनी त्यांचे नाव सुचवले असून नीळकंठ हळर्णकर यांनी अनुमोदन दिले आहे. सभापती पदाची निवडणूक मंगळवारी होणार आहे. मात्र, उद्या शपथविधी सोहळा असल्याने उमेदवारी अर्ज आजच भरला आहे. भाजपचे उमेदवार रमेश तवडकर हेच बहुमताने विजयी होतील, असे सावंत म्हणाले.

भाजपकडे 25 संख्याबळ!

विधानसभेत भाजपकडे 25 संख्याबळ आहे. यासाठी त्यांना मगो आणि अपक्ष आमदारांची मदत होणार आहे. तर विरोधकांकडे केवळ 15 आमदार आहेत. यात कॉंग्रेस 11, आम आदमी पक्ष 2 आणि आरजी एक तसेच गोवा फॉरवर्डच्या एका आमदाराचा समावेश आहे. बहुमतासाठी 21 हा जादुई आकडा आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची सरशी होणार, हे स्पष्ट असले तरी कॉंग्रेसने पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकाची भूमिका निभावण्याचे ठरवले असल्याने ही निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.

सभापती पदासाठी रमेश तवडकर यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी होईल. मात्र, सोमवारी शपथविधी सोहळा असल्याने उमेदवारी अर्ज आजच भरला. आम्हाला खात्री आहे, की रमेश तवडकर हेच बहुमताने विजयी होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT