रमेश तवडकर Dainik Gomantak
गोवा

प्रत्येकाच्‍या सुखदुःखात सहभागी व्‍हा: रमेश तवडकर

काणकोणात भाजप बूथ कार्यकर्ता मेळाव्‍यात मार्गदर्शन

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण मतदारसंघात 59 बूथ असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षातर्फे देण्यात आलेला उपक्रम यशस्वी करण्यासाठी 100 टक्के योगदान दिले पाहिजे. पुढील दहा दिवसांत आपल्याला प्रामुख्याने तीन उपक्रम यशस्वी करावयाचे आहेत. तळागाळातील घटकाला आपले माना, त्‍यांच्‍या सुखदु:खात सहभागी व्‍हा, असे आवाहन आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी केले.

श्रीस्थळ-काणकोण येथील पंचायत सभागृहात आज रविवारी भाजप मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बूथ प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना तवडकर बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, उपाध्यक्ष शाबा नाईक गावकर, उपनगराध्यक्ष अमिता पागी, नगरसेवक हेमंत नाईक गावकर, रमाकांत नाईक गावकर, सारा देसाई, एन. फर्नांडिस, प्रदेश भाजपा सदस्य चंदा देसाई, दक्षिण गोवा उपाध्यक्ष महेश नाईक, द. गो. सरचिटणीस मनुजा नाईक गावकर, महिला मोर्चा अध्यक्ष वृंदा सतरकर हजर होत्‍या.

दरम्‍यान, दि. 6 एप्रिल रोजी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे काणकोण दौऱ्यावर येणार असून किडणी रुग्णांना सहाय्य करणार आहेत. याचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना व्हावा अशी व्यवस्था कार्यकर्त्यांकडून व्हावी अशी अपेक्षा तवडकर यांनी व्यक्त केली. प्रारंभी भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई यांनी स्वागत केले. सरचिटणीस दिवाकर पागी यांनी पक्षाच्या कार्यक्रमांसंबंधी माहिती दिली तर रमाकांत नाईक गावकर यांनी सिद्धार्थ देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सचिव विशांत गावकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT