Rambo Circus in Goa 
गोवा

Circus in Goa : गोव्यात 16 सप्टेंबरपासून रंगणार रॅम्बो सर्कस

तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोव्यात रॅम्बो सर्कस मडगाव येथील रविंद्र भवन येथे तीन दिवस सर्कसप्रेमींसाठी खेळ सादर करणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Circus in Goa : तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गोव्यात रॅम्बो सर्कस मडगाव येथील रविंद्र भवन येथे येत्या 16 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर असे तीन दिवस सर्कसप्रेमींसाठी खेळ सादर करणार आहे. कोविड महामारीमुळे बराच काळ सर्कशींचे आयोजन करण्यावर बंदी होती. त्यामुळे काही सर्कशी बंद पडल्या. मात्र रॅम्बो सर्कसने ऑनलाईन सर्कस खेळ सुरु ठेवले अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

रॅम्बोने शाळकरी मुलांच्या मनोरंजनासाठी ब्लू टूथ, झूम अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्कशीचे शो सादर केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा रॅम्बो सर्कस प्रत्यक्ष खेळ सादर करणार आहे. श्‍वास रोखून धरणाऱ्या विविध प्रकारच्या कसरती ज्यात स्केटिंगचा थरार, शिडीवरील कसरती, क्युब जगलिंग, रोल्ला बोल्ला, हुल्ला हुप आणि हवेतील दोरीवरील कसरती अशी पूर्णस्वरूपी 75 मिनिटांचा शो रसिकांना पहायला मिळणार आहे. तसेच विदुषकाच्या मनोरंजक कृती हे छोट्यांसाठी आकर्षण असेल.

सर्कसचे खेळ

वातानुकूलीत सभागृहात या सर्कसचे खेळ 16 सप्टेंबर रोजी दु. 12.30 वा., दु. 3 वा. आणि संध्या. 5 वा. होणार आहेत. 17 रोजी सकाळी 10 वा., दु. 12 वा., रात्री 8 वा. व रात्री 10 वा. असे चार खेळ सादर होणार आहेत. 18 रोजी दु. 1.30 वा., संध्या. 4.30 वा., 7.30 वा. आणि रात्री 9.30 वा. होणार आहेत. या प्रयोगांचे तिकीट दर रू. 300 व रू. 700 असे आहेत. तिकिटे बुकमायशोवर उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT