Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Rama kankonkar Assault Case: जेनिटोच्या सांगण्यावरुन रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला केल्याचे अटक संशयितांनी चौकशीत कबुली दिली होती.

Pramod Yadav

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या आठ जणांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझसह इतरांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. दुसरी पोलिसांकडून आठ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA)  अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. 

पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने निर्णय देताना कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझ (३६) अँथनी नादार (३१), फ्रान्सिस नादार (२८), मिंगेल आरावजी (२४), मनीष हडफडकर (२४), सुरेश नाईक (३१), फ्रांको डिकॉस्टा आणि साईराज गोवेकर (२८) यांना न्यायालयीन कोठीत पाठवले आहे. जेनिटोच्या सांगण्यावरुन रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला केल्याचे अटक संशयितांनी चौकशीत मान्य केले होते.

गुंड जेनिटोसह इतरांना तडीपार करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे कळविले आहे. करंजाळे येथे सामाजिक कार्यकर्ते यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. रामा यांची प्रकृती स्थीर असली तरी त्यांनी अद्याप जबाब नोंदवला नाही.

काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी सर्व विरोधी पक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला. तसेच, या हल्ल्यामागील सूत्रधार शोधण्याची मागणी केली. गुंड जेनिटोला अटक करण्यात आली असली तरी अद्याप या हल्ल्यामागील उद्देश अद्याप समोर आलेला नाही तसेच, सूत्रधार देखील उजेडात आलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT