rama kankonkar assault case Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Rama Kankonkar Case: प्रकरणाचा तपास जलद गती आणि पूर्णपणे निःपक्षपातीपणे सुरू असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले

Akshata Chhatre

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास जलद गती आणि पूर्णपणे निःपक्षपातीपणे सुरू असल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचे प्रयत्न होत असताना, त्यांनी या आरोपांचा सडेतोड खंडन केलेय.

मुख्य आरोपींसह ८ जणांना अटक

एस.पी. राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. हल्ला करणारे मुख्य आरोपी झेनिटो कार्डोजो याच्यासह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. पाच जणांच्या चौकशीतून साईराज गोवेकर आणि फ्रँको डी'कोस्टा यांना अटक करण्यात आली.

तपासात, दि. १४ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांना धडा शिकवण्याचा कट झेनिटो कार्डोजो आणि इतरांनी रचल्याचे उघड झाले आणि झेनिटो कार्डोजोला २१ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सध्या सर्व ८ आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गुप्ता यांनी सांगितले की, "आम्ही सर्व आरोपींची कसून चौकशी केली आहे आणि गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्यही जप्त केले असून तपास सुरु आहे."

पीडितानेच जबाब देण्यास केली टाळाटाळ

या प्रकरणाच्या तपासाला आव्हान देणाऱ्या विधानांवर एस.पी. राहुल गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, गोमेकॉ रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून काणकोणकर यांना जबाब देण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. असे असूनही, त्यांनी दि. १९ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत वारंवार जबाब देण्यास असमर्थता दर्शवली.

एसडीपीओ (SDPO) पणजी आणि तपास अधिकारी सुदेश नाईक यांनी स्पष्ट केले की, रामा काणकोणकर यांचा पीएसआय मंजुनाथ नाईक यांनी नोंदवलेला पहिला व्हिडिओ-रेकॉर्डेड जबाब आणि त्यानंतरच्या जबाबांमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव नव्हते.

राजकीय हस्तक्षेपाचे आरोप निराधार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्यावर रामा काणकोणकर यांनी केलेल्या आरोपांविषयी एस.पी. गुप्ता यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी जोर दिला की, तपास निःपक्षपाती: "तपास केवळ गुणवत्तेच्या आधारावर आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय केला जात आहे आणि "आम्ही स्पष्ट करतो की, या प्रकरणात कोणत्याही राजकारण्याचा सहभाग नाही."

सध्या रामा काणकोणकर आणि त्यांच्या कुटुंबाला चोवीस तास पोलीस संरक्षण पुरवण्यात आले असून एस.पी. राहुल गुप्ता यांनी जनतेला आवाहन केले आहे की, तपास निष्पक्षपणे सुरू असून, लोकांनी या विषयाचे राजकारण करू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व तथ्ये न्यायालयासमोर आणि जनतेसमोर लवकरच मांडली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT