Rama Kankonkar Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: 'रामा काणकोणकर' पडले एकाकी? विरोधकांचा थंड प्रतिसाद; भाजप पोलिस तक्रार करण्याची शक्यता

Rama Kankonkar Case: समाजमाध्यमांवर आवाज करून आपले अस्तित्व दाखवून देण्यात अनेकांनी धन्यता मानली असली तरी हा विषय लावून धरावा, असे कुणाला वाटते की नाही, याविषयी शंका आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्या मुद्यावरून विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चालली आहे. त्यामुळे काणकोणकर हे एकाकी पडल्याचे चित्र आहे.

काणकोणकर यांनी इस्पितळातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सनसनाटी आरोप करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यात विरोधकांनी तेवढ्याच जोरकसपणे आवाज मिसळला नाही. या मुद्यावरून रस्त्यावर आंदोलन करण्याची कोणाचीही मनःस्थिती दिसत नाही.

समाजमाध्यमांवर आवाज करून आपले अस्तित्व दाखवून देण्यात अनेकांनी धन्यता मानली असली तरी हा विषय लावून धरावा, असे कुणाला वाटते की नाही, याविषयी शंका आहे.

काणकोणकर यांना मारहाण होऊन २४ दिवस उलटले तरी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी जो रेटा लावणे आवश्यक वाटत होता तो विरोधकांकडून लावण्यात आला नसल्याचे दिसून येते. अजूनही काही ठिकाणी मेणबत्त्यांच्या फेऱ्या निघतात, मात्र त्याची दखल माध्यमांतूनही फारशी घेतली गेल्याचे दिसत नाही.

पोलिस तक्रारीचा भाजपचा विचार

काणकोणकर यांनी मुख्‍यमंत्री सावंत व पर्यटनमंत्री खंवटे यांच्‍यावर बिनबुडाचे आरोप करीत सरकार आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. या प्रकरणात पुढे काय कृती करायची, काणकोणकर यांच्‍याविरोधात तक्रार दाखल करायची का, याबाबत सध्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांची चर्चा सुरू आहे, असेही भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मैं नहीं खाउंगा, मोटा हो जाउंगा" जयस्वाल केक घेऊन आला, पण 'हिटमॅन'ने दिला नकार Watch Video

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: हडफडे दुर्घटनेप्रकरणी रोशन रेडकर यांना चौकशीसाठी बोलावले; हणजूण पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

SCROLL FOR NEXT