Rama Kankonkar  Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar: 'त्‍याचवेळी मुख्‍यमंत्र्यांकडे बोट का नाही दाखवले'? खंवटे, पोलिसांसह भाजपने फेटाळले काणकोणकरांचे आरोप

Rohan Khaunte: रविवारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्‍यासह पोलिस आणि प्रदेश भाजपनेही रामा यांच्‍याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करीत त्‍यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आपल्‍यावर झालेल्‍या हल्ल्‍यामागे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचा हात असल्‍याचा संशय सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी शनिवारी व्यक्त केल्‍यानंतर मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्‍यांना लगेच प्रत्‍युत्तर दिले होते.

त्‍यानंतर रविवारी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्‍यासह पोलिस आणि प्रदेश भाजपनेही रामा यांच्‍याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी करीत त्‍यांनी केलेले आरोप धादांत खोटे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. संपूर्ण भाजप संघटना व सरकारमधील मंत्री यांनी एकजुटीचे दर्शन घडवत रामा यांचे आरोप खोडून काढावेत, असे पक्षाने ठरविले आहे.

गोमेकॉतून डिस्‍चार्ज मिळाल्‍यानंतर समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी केलेले आरोप तथ्‍यहीन आहेत. गोमेकॉत त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असताना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍वत: तेथे जाऊन त्‍यांची विचारपूस केली होती.

काणकोणकर यांना मुख्यमंत्र्यांवर संशय होता, तर त्‍याचवेळी त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे बोट का दाखवले नाही? असा सवाल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. रामा यांचा ‘बोलविता धनी’ वेगळाच असून, पोलिसांनी त्‍याचा शोध घेणे महत्त्‍वाचे असल्‍याचेही ते म्‍हणाले.

पहिल्‍या जबाबात रामाने मंत्र्यांची नावे घेतली नव्‍हती! पोलिसांकडून स्‍पष्‍ट

रामा काणकोणकर यांनी २ ऑक्‍टोबर रोजी दिलेल्‍या जबाबात कोणत्‍याही मंत्र्याचे नाव घेतलेले नव्‍हते, असे या प्रकरणाचा तपास करीत असलेल्‍या उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी रविवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना स्‍पष्‍ट केले.

पोलिस महासंचालक अलोक कुमार आणि उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्‍ताही यावेळी उपस्‍थित होते. रामा यांच्‍यावरील हल्ला प्रकरणाचा तपास पारदर्शकरित्‍या सुरू आहे. जेनिटो कार्दोज, मिंगेल आरावजो आणि फ्रान्‍सिस या तिघांनी मिळून रामावर हल्ला करण्‍याचा कट काही दिवस आधी रचला होता, असे अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी सांगितले.

रामा यांचा जबाब व्‍हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे नोंदविला आहे. यावेळी त्‍यांचे वकील आणि पत्‍नीही उपस्‍थित होती. रामा यांना संशयितांना ज्‍या केबलने मारहाण केली, तसेच संशयित ज्‍या तीन दुचाकींवरून आले होते, त्या केबल आणि दुचाकीही जप्‍त केल्‍या आहेत. संशयितांनी काही पुरावे नष्‍ट करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍याचाही पोलिस शोध घेत आहेत, असे ते म्‍हणाले.

जबाब आम्ही सार्वजनिक केला नाही

रामा यांचा जबाब घेतल्‍याशिवाय या प्रकरणाच्‍या पुढील तपासाला गती मिळणार नव्‍हती. त्‍यामुळे पोलिसांनी त्‍यांचा जबाब नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे. काणकोणकर यांनी दिलेल्‍या जबाबाची प्रत पोलिसांनी त्‍यांच्‍या कुटुंबीयांना दिली.

परंतु, त्‍यांचा जबाब पोलिसांनी सार्वजनिक केला नाही, असे राहुल गुप्‍ता म्‍हणाले. या प्रकरणातील संशयित जेनिटो कार्दोज याने जामिनासाठी न्‍यायालयात अर्ज दाखल केला आहे. परंतु, त्‍याच्या जामिनाला पोलिसांकडून विरोध केला जाईल, असे सुदेश नाईक यांनी स्‍पष्‍ट केले.

‘ॲट्रासिटी’अंतर्गत होणार कारवाई

संशयितांनी मारहाण करताना जातीवाचक शिविगाळ केल्‍याचा दावा काणकोणकर यांनी जबाबात केला होता. त्‍यानुसार या प्रकरणात संशयितांवर एससी, एसटी कायद्यानुसार कारवाई करण्‍याची शिफारस केल्‍याचेही गुप्‍ता म्हणाले.

काय म्‍हणाले मंत्री रोहन खंवटे?

१ रामाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‍संशयितांना अटक केली. संशयितांनी दिलेल्‍या जबाबानुसार पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

२ रामा यांनी जो जबाब दिला, त्‍यात कोणाचेही नाव घेतले नव्‍हते. परंतु, २४ व्‍या दिवशी ‍ मुख्‍यमंत्री आणि माझे नाव घेतले.

३उपचार घेत असलेल्‍या काळात खुद्द मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनीही गोमेकॉत जाऊन रामांची भेट घेतली.

४ त्‍यांना आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांनाही मुख्‍यमंत्र्यांनी सुरक्षा पुरवली.

५ रामांचा मुख्‍यमंत्र्यांवर संशय होता, तर मुख्‍यमंत्री भेटायला गेले होते त्‍यावेळीच त्‍यांनी त्‍यांच्‍याकडे का बोट दाखवले नाही?

६ गोमेकॉतील २३ दिवसांत विरोधी पक्षांचे नेते, समाज कार्यकर्त्यांनीही रामा यांची भेट घेतली होती.

७ डिस्‍चार्जनंतर त्‍यांनी मुख्‍यमंत्री आणि माझ्‍यावर जे आरोप केले, त्‍यामागे राजकारण असण्‍याचा संशय आहे.

८ रामांच्‍या तोंडी ज्‍यांनी ही वक्तव्‍ये घातली, त्‍यांचा शोध घेऊन कारवाई होणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT