Ram Mandir Ayodhya 
गोवा

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारचा मोठा निर्णय

गोवा सरकारने यापार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

Pramod Yadav

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत उभारल्या जात असलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. रामभक्तांची प्रतीक्षा अखेर संपली असून, या दिवशी भगवान राम मंदिरात विराजमान होतील.

सरकारने या दिवशी सर्वसामान्यांना अयोध्येत न येण्याचे आवाहन केले असून, ते जिथे असतील तिथे कार्यक्रम आयोजित करून आनंदोत्सव साजरा करण्याची विनंती केली आहे.

गोवा सरकारने यापार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.

गोवा सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांना असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

योध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी भाजपने आणि योगी सरकारच्या वतीने जोरदार तयारी केली आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तयारीसाठी भाजप संघटनेचे अनेक वरिष्ठ नेते अयोध्येला भेट देत आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाजप 25 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत राम मंदिर दर्शनासंदर्भात देशभरात बूथ स्तरावर मोहीम राबवणार आहे. या अभियानांतर्गत देशभरातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना पक्ष मदत करेल.

पक्षाचे कार्यकर्ते बूथ स्तरापर्यंत तैनात केले जातील, जे अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना आपापल्या बूथवरून राम मंदिराच्या दर्शनासाठी मदत करतील.

पक्षाने दररोज 50 हजार भाविकांना राम मंदिरात दर्शन देण्याची योजना आखली आहे. दोन महिन्यांत हा आकडा 30 लाखांवर पोहोचेल. अयोध्येतील या संपूर्ण प्रचाराची जबाबदारी उत्तर प्रदेश भाजपचे नेते आणि कार्यकर्ते घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT