rakul preet singh MD
गोवा

Rakul Preet Singh At IFFI: '..पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही'; रकुलप्रीतने Nepotism बद्दल मांडले स्पष्ट मत

IFFI 2024: आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर अशा नकारात्मक गोष्‍टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अशा गोष्‍टींना योग्य वेळी बाजूला सारले तर पुढील वाटचाल सुरळीत होते, असे अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Rakul Preet Singh At IFFI 2024

पणजी: एक कलाकार आणि एक उत्पादन यात काहीच फरक नसतो. उत्पादकाला जसे वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देतात, तसेच कलाकारालाही टिप्पणी करतात. आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर अशा नकारात्मक गोष्‍टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अशा गोष्‍टींना योग्य वेळी बाजूला सारले तर पुढील वाटचाल सुरळीत होते, असे अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने सांगितले. यावेळी निर्माता जॅकी भगनानी उपस्‍थित होते.

रकुलने सांगितले की, आजकाल सहसा मित्र आणि ओळखीच्या लोकांना पाठिंबा देण्याचा अर्थ हा नेपोटिझमसाठी जोडला जातो. पार्ट्यांना हजेरी लावल्यामुळे चित्रपटांत भूमिका मिळत नाही, कलाकारांनी पार्ट्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.

मी माझ्या प्रवासात मागे वळून पाहते तेव्हा माझ्या यशात एक गोडवा वाटतो. जेव्हा या क्षेत्रात मी पदार्पण केले तेव्हा मला कलेचा आत्मा माहीत नव्हता. त्‍यासाठी वेळ द्यावा लागला. मी त्या क्षेत्रातील नसल्याने स्वतःची ओळख करण्यात काही काळ गेला असला तरी प्रयत्नांचा गोडवा आजही सुखावतो.

जॅकी भगनानी यांनी चित्रपट घराण्यातून येण्याचे फायदे मान्य केले तरी कठोर परिश्रम आणि समर्पणाची गरज देखील अधोरेखित केली. मी सिनेघराण्यातून आलो असलो तरी ऑटो ते चार्टरपर्यंतच्या प्रवास पहिला आहे.

चित्रपट पार्श्वभूमी असली तरी यशाची हमी नाही. माझ्या वडिलांचा प्रवास शून्यापासून शंभरपर्यंत होता आणि माझा शंभरपासून हजारपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT