Rajani Patil on Goa Congress Defeat Dainik Gomantak
गोवा

'मतविभाजनामुळेच गोव्यात काँग्रेसचा पराभव'

रजनी पाटील यांचा दावा, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची घोषणा लवकरच

दैनिक गोमन्तक

पणजी : रिव्होल्युशनरी गोवन्स, आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी केलेल्या मतविभाजनामुळेच काँग्रेसला पराभवाचा फटका बसला, असे मत काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षक रजनीताई पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ गटनेत्याची लवकरच घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत (Goa Election) मतविभाजनाचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला. सुमारे 10 मतदारसंघांमध्ये आरजी, आप आणि तृणमूल काँग्रेसने मत फोडल्यामुळे काँग्रेसचे (Congress) उमेदवार पराभूत झाले. सध्याची परिस्थिती अधिक बिकट बनत चालली आहे. दिवसेंदिवस महागाईने कळस गाठलेला आहे. त्यामुळे भाजपच्या या निर्णयाविरोधातील लढा कॉंग्रेसकडून तीव्र केला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

पराभूत झालेल्या उमेदवारांसोबत चर्चा सुरू आहे. उत्तर गोव्यातील (North Goa) उमेदवारांच्या समवेत चर्चा झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील उमेदवारांच्या सोबत चर्चा झाली आहे. यावेळी पराभवाची कारणे, पुढील वाटचाल यासंबंधीचा या उमेदवारांची मते ऐकून घेतली जात आहेत. याचा अहवाल बनवला जात असून लवकरच तो केंद्रीय पक्षश्रेष्ठीला सादर करण्यात येईल. यानंतर भविष्यातील वाटचालीच्या संदर्भातले निर्णय घेतले जातील, असे रजनी पाटील म्हणाल्या.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सर्वच राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींनी घेतले आहेत. आता नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी आमदार संकल्प आमोणकर आणि सरचिटणीस जनार्दन भंडारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबरोबरच गोवा विधानसभेतील विधीमंडळ नेते पदाचीही निवड लवकरच केली जाईल, अशी माहिती रजनीताई पाटील यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT