कारवार: भारतीय नौदल शांततेच्या उद्देशाने काम करत असून, भारतीय नौदल संपूर्ण भारतीय महासागर क्षेत्राला सुरक्षित ठेवते. ज्यावेळी देशावर संकट उभे राहते, तेव्हा प्रथमतः संकटसमयी भारतीय नौदल तात्काळ मदतीला धावते. भारत केवळ संरक्षण देत नसून आपल्या विश्वासाला प्राप्त ठरत व्यवहारात पारदर्शकता आणून ती आपल्या कृतीने सिद्धही करतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथील कदंब नौदल तळावर भारतीय नौदलाच्या ‘आयओएस सागर’ मोहिमेचे शनिवारी उदघाटन केले. ही मोहीम भारतीय महासागर क्षेत्रातील (आयओआर) मित्र देशांबरोबर सागरी सहकार्य आणि स्थैर्य वाढविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचवेळी त्यांनी २० हजार कोटी रुपयांच्या ‘सीबर्ड’ प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या विविध सागरी पायाभूत सुविधांचे उद््घाटनही केले.
याप्रसंगी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारताचा ‘महासागर’ हा जागतिक दक्षिण भागासाठीचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन आहे, जो सुरक्षितता आणि विकास सुनिश्चित करतो. ‘आयओएस सागर’ ही मोहीम भारताच्या परस्पर सहकार्य आणि सर्वसमावेशक प्रगतीच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नौदलाच्या ‘आयएनएस सुनयना’ या युद्धनौकेला भारतीय आणि नऊ मैत्रिपूर्ण परदेशी देशांच्या सागरी जवानांसह ध्वज दाखवून रवाना करण्यात आले.
सीबर्ड, आशियातील सर्वांत मोठा तळ
राजनाथ सिंह यांनी कदंब नौदल तळावरील नव्याने विस्तारित सागरी पायाभूत सुविधांची पाहणी केली. ''सीबर्ड'' प्रकल्पांतर्गत उभारलेला हा तळ आशियातील सर्वांत मोठा नौदल तळ आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च २० हजार कोटी रुपये असून यामुळे नौदलाची कार्यक्षमता व ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.