Ponda  Dainik Gomantak
गोवा

सोयींपेक्षा गैरसोयीच जास्त असलेल्या फोंड्याला फक्त आश्‍वासनेच मिळाली..

काँग्रेसमुळेच शहराचा विकास शक्य, फोंड्याच्या विकासात मगो-भाजप अपयशी राजेश वेरेकर यांचा आरोप...

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा मतदारसंघाच्या विकासात मगो आणि भारतीय जनता पक्ष पूर्णपणे अपयशी ठरले असून सोयींपेक्षा गैरसोयीच जास्त असलेल्या फोंड्याला फक्त आश्‍वासने तेवढी मिळाली असल्याचे काँग्रेसचे (Goa Congress) फोंड्यातील उमेदवार राजेश वेरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. फोंड्यात आयोजित या पत्रकार परिषदेला गट काँग्रेसचे जॉन परेरा, ट्रिबेलो सौझा, नगरसेवक विलियम आगियार, पंच सदस्य शैलेश शेट, सांतान फर्नांडिस तसेच प्रकाश सावंत आदी उपस्थित होते. (Rajesh Verekar allegation that mgp-bjp failed in development of ponda)

राजेश वेरेकर म्हणाले की, विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. माजी आमदार रवी नाईक (MLA Ravi Naik) यांनी फोंडा मतदारसंघात विकासकामे केली, पण या विकासकामातूनही नागरिकांना चांगले ते देण्याची, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याची आज खरी गरज आहे. गेल्या दहा वर्षांत त्यासाठी काहीच काम झाले नाही.

फोंड्यातील रस्त्यांचा प्रश्‍न जटील बनला आहे.

फोंड्यात (Ponda) कायम खराब रस्ते पाहायला मिळतात. फोंड्यातून मालवाहतूक जास्त होत असल्याने या ठिकाणी सुसज्ज असे ट्रक टर्मिनस व्हायला हवे अन्य मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. कुर्टी भागात सुसज्ज असे मिनी मार्केट संकुल उभारण्याची खरी गरज आहे, हे मिनी मार्केट उभारले, तर फोंड्यावरील वाहतूक आणि इतर ताण कमी होऊ शकेल. केवळ भौतिक विकासच नव्हे, तर व्यक्ती विकास साधताना सक्षम नागरिक निर्माण करायला हवेत. फोंड्यात काँग्रेसच्या काळातच विकास झाला, पण मगो आणि भाजपने सत्ता असूनही फोंड्याचा कोणताही विकास केला नाही. त्यामुळे आता हे पुन्हा घडणार नाही,

फोंड्याला पुढे नेण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध आहे.

जॉन परेरा म्हणाले की, फोंडा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या दहा वर्षांत कोणतेच काम झाले नाही. फक्त आश्‍वासने तेवढी पहायला मिळाली. काँग्रेस पक्ष हा विकासाला चालना देणारा पक्ष आहे, त्यामुळे आताही काँग्रेस पक्षच फोंड्याचा विकाससाधू शकतो.

ट्रिबेलो सौझा यांनीही फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळाचा प्रश्‍न उपस्थित करताना मगो आणि भाजप सत्तेवर असतानाही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून या इस्पितळात कोणत्याच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे जमले नसल्याचे सांगितले. मगो आणि भाजपने फक्त कामाचा देखावा केला आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT