Rajesh Patnekar Dainik Gomantak
गोवा

राजेश पाटणेकरांच्या मतपरिवर्तनाचे प्रयत्न असफल

विधानसभा निवडणूक न लढवण्यावर सभापती राजेश पाटणेकर ठाम

दैनिक गोमन्तक

डिचोली : निवडणूक न लढवण्याचा निर्णय सभापती राजेश पाटणेकर यांनी मागे घ्यावा, यासाठी भाजपचे मंडळ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी केली. मात्र, सभापती आपल्या निर्णयावर ठाम आहेत. राजेश पाटणेकर यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे भाजपसमोर डिचोलीत मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. राजेश पाटणेकरांनी निवडणूक न लढवणे हा भाजपसाठी एक मोठा धक्का आहे.

सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांचे मन वळवण्याचा प्रयत्न बुधवारी मंडळ पदाधिकाऱ्यांसह सर्व संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, पाटणेकर यांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला. आपला निर्णय अंतिम असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यामुळे राजेश पाटणेकर यांच्या निवडणूक न लढवण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. असं असलं तरीही राजेश पाटणेकरांच्या जागी नवा उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचं आव्हान भाजपसमोर (BJP) आहे.

निवडणूक (Goa Assembly Elections) न लढवण्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले तरी पाटणेकर कार्यकर्त्यांशी ताजेतवाने असल्याचे दिसत होते. यामुळे त्यांच्या नकारामागचे कारण वेगळेच असल्याच्या संशयास पुष्टी मिळाल्याची प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिली. दरम्यान अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाजपमध्ये यावे यासाठी त्यांना राजी करण्याचे यत्न भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी सुरुच ठेवले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; चीनी बॉक्सिंगपटूला दिली मात

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

Goa FDA: तीन महिन्यांत 20.43 लाखांचा दंड; 'एफडीए'ची धडक कारवाई, 2,528 अन्न आस्थापनांची तपासणी

SCROLL FOR NEXT