Goa Revolution Day
Goa Revolution Day Dainik Gomantak
गोवा

राजभाषा मराठीसाठी जागृती करणार; मराठीप्रेमींचा निर्धार

दैनिक गोमन्तक

मोरजी: क्रांतिदिनी पत्रादेवीत हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मराठीप्रेमींनी मराठी राजभाषेसाठी नवी क्रांती करण्याचा निर्धार केला. जोपर्यंत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत गावागावात जनजागृतीसाठी चळवळ उभारण्याचे निश्‍चित केले.

(Rajbhasha will raise awareness for Marathi in goa)

पेडणे तालुक्यातील आणि राज्यातील मराठीप्रेमींनी ज्या पद्धतीने कोकणी भाषेला राजभाषेचा मुकुट परिधान केलेला आहे. त्याच पद्धतीने गोवा सरकारने ही मराठीला मानाचे स्थान देऊन राजभाषेचा दर्जा द्यावा. यासाठी मराठीप्रेमींनी क्रांतिदिनी पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाकडे पुष्पचक्र पुष्पांजली वाहून मराठी राजभाषा होण्यासाठी निर्धार केला.

पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, पत्रकार संगम भोसले, अमृत आगवाडेकर, उमेश गाड, अग्निशामन दलाचे माजी अधिकारी गोपाळ शेट्ये महादेव गवंडी, राजेश दाभोळकर, साईनाथ देसाई, तुयेचे सामाजिक कार्यकर्ते उदय मांद्रेकर, माजी सैनिक अनिल बोन्द्रे आदी उपस्थित होते.

आमोणकर म्हणाले, राजभाषा व्हावी, यासाठी पुन्हा एकदा 2012 पासून राज्यात गावागावांत चळवळ उभारली. मराठी भाषा ही आमच्यावर संस्कार करणारी भाषा आहे. आमची संस्कृती जतन करणारी भाषा आहे आणि ती भाषा टिकवणे आमचे परमकर्तव्य आहे.

त्यासाठी कोणतेही दिव्य पार करण्याची आमची तयारी आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मराठी वृत्तपत्रे चालतात, काही राज्यकर्त्यांनी बोडगेश्वर प्रांगणात भाजप सरकारचे 21आमदार निवडून आले, तर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते.

पण आश्‍वासनाची पूर्ती झाली नाही. पर्रीकर यांचा वारसा चालवणारे डॉ. प्रमोद सावंत हे बहुजन समाजाचे नेते आहे. आणि तेच आता मराठीला राजभाषेचा स्थान मिळवून देतील. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी संस्कार केंद्र, साखळीचे अध्यक्ष होते. याची जाणीव ठेवून त्यांनी मराठीला मानाचे स्थान द्यावे, अशी मागणी यावेळी आमोणकर यांनी केली.

यावेळी उमेश गाड, व्यंकटेश नाईक, संगम भोसल, अमृत आगरवाडेकर, महादेव गवंडी, निवृत्ती शिरोडकर उदय मांजरेकर माजी सैनिक अनिल बोंद्रे आदींनी मराठी भाषेविषयी आपले विचार प्रकट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT