Canacona Fishing Boat Accident Dainik Gomantak
गोवा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Rajbag Shore Boat Capsized: काणकोणमधील राजबाग किनाऱ्यावर (Rajbag Shore) पुन्हा एकदा मासेमारीची बोट उलटल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Canacona Fishing Boat Accident: काणकोणमधील राजबाग किनाऱ्यावर (Rajbag Shore) पुन्हा एकदा मासेमारीची बोट उलटल्याची घटना समोर आली आहे. मासेमारी करुन परतत असताना ही दुर्घटना घडली. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीचे एक काम संपवून बोट (Boat) राजबाग किनाऱ्याकडे परत येत होती. त्याचवेळी अचानक बोट उलटली. ही घटना पाहताच किनाऱ्यावरील स्थानिक नागरिक (Locals) तात्काळ मदतीला धावले. त्यांनी सुरुवातीला बोट किनाऱ्यावर खेचून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर, जेसीबीच्या (JCB) मदतीने ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, राजबाग किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात वाळू साचत असल्यामुळे मासेमारीच्या बोटींना किनारा गाठणे किंवा समुद्रात जाणे अत्यंत धोकादायक झाले आहे. वाळूच्या अडथळ्यामुळे बोटींचे संतुलन बिघडते आणि त्या उलटतात. अशा घटना जवळपास दरवर्षी याच ठिकाणी घडतात.

काणकोणचे (Canacona) माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी यांनी या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, स्थानिकांच्या जीविताची आणि उपजीविकेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. वारंवार होणाऱ्या या अपघातांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, गोव्याचा भावी मुख्यमंत्री कोण?

Super Cup 2025: धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

SCROLL FOR NEXT