Goa Abduction Case Dainik Gomantak
गोवा

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Abduction Case: राजस्थाच्या व्यक्तीचे माडेल येथून अपहरण करण्यात आले तसेच, त्याला मारहाण करुन लुटमार केली.

Pramod Yadav

Goa Abduction Case

राजस्थानच्या एकाचे माडेल, थिवी येथून अपहरण झाल्याची तक्रार रविवारी कोलवाळ पोलिस स्थानकात दाखल झाली. याप्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि दिल्लीच्या रहिवासी तिघांना सावंतवाडी येथून अटक केलीय.

संशयितांनी अहरण केलेल्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.

हितेश बाबुलालजी जनगीड (माडेल, थिवी मूळ राजस्थान) यांचे रविवारी (दि.28) अहरण झाल्याची तक्रार कोलवाळ पोलिस स्थानकात दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत घटनेच्या तपासास सुरुवात केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, तीन संशयितांनी कारमधून हितेश यांचे अपहरण केल्याची माहिती कोलवाळ पोलिसांना मिळाली. यात तीन धिप्पाड व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलिसांना समजले.

पोलिसांनी याप्रकरणी बलवीर सिंग शिशपाल गुर्जर (३३, राजस्थान), राजकुमार गिरीधारी लाल चौधरी (३३, राजस्थान) आणि वीरेंद्र सुर्जित सुमार (५९. दिल्ली) यांना अटक केली असून, अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे.

अपहरणकर्त्यांनी हितेश यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. संशयितांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन, सोन्याची अंगठी आणि पाच हजार रुपयांची रोकड असणारे पाकिट हिसकावून घेतले.

पोलिसांनी याप्रकरणी अपहरण, मारहणीचा गुन्हा नोंद करुन तिघांना अटक केलीय. कोलवाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT