CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: ‘राजस्थान सरकार गैरव्यवहारात प्रथम’

CM Pramod Sawant: राजस्थानातील भिवडी येथे परिवर्तन संकल्प यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: छत्तीसगडनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजस्थानमधील परिवर्तन संकल्प यात्रेत सहभागी होत राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार कोणत्या बाबतीत देशात पहिले आले अशी विचारणा करत केवळ गैरव्यवहाराच्या मुद्यावर राजस्थान सरकारने प्रथम क्रमांक पटकावल्याचा आरोप केला.

राजस्थानातील भिवडी येथे परिवर्तन संकल्प यात्रेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले. मुख्यमंत्री म्हणाले, भ्रष्टाचार आणि कॉंग्रेसचे जवळचे नाते आहे. अशी कृत्ये लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न गेहलोत सरकार करत आहे.

जलजीवन मोहिमेतील भ्रष्टाचार कॉंग्रेस सरकारला घरचा रस्ता दाखवेल. तेथील एक मंत्री राजेंद्र गुधा यांनी त्यांच्याकडे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या बेनामी व्यवहारांची माहिती असलेली डायरी असल्याचे म्हटले होते.

त्याचा संदर्भ घेत डॉ. सावंत यांनी ती लाल डायरी दडवण्याचा गेहलोत यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशारा दिला.

गेहलोत सरकारला केवळ जाहिरातबाजीने आपली छबी उजळवता येणार नाही असे नमूद करून ते म्हणाले, गेहलोत यांनी राजस्थान कोणत्या क्षेत्रात अग्रेसर आहे ते सांगावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT