Shri P.S. Sreedharan Pillai dainik gomantak
गोवा

Food bank for poor : राजभवन देणार 100 बेघर व्यक्तींना अन्न

राजभवन दर आठवड्याला 100 बेघर व्यक्तींना देणार अन्नाची पाकिटे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील सरकार प्रमाणेच राजभवनकडून ही आपल्या जनतेची काळजी घेतली जाते. जनताभिमुख अनेक उपक्रम शासन राबवत असते. त्याप्रमाणे काही उपक्रम राजभवनकडून ही हाती घेतली जातात. याचाच भाग म्हणून राजभवनाकडून 'food bank for poor' उपक्रम हाती घेण्यात आला असून आज त्याची सुरूवात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते राजभवन येथे झाली. या उपक्रमांतर्गत सांगोल्डा स्ट्रीट प्रोव्हिडन्सचे संस्थापक डोनाल्ड फर्नांडिस यांच्याकडे जेवण पहिले पाकिट देण्यात आले. तर या उपक्रमांतर्गत आठवड्यातून एकदा 100 बेघर लोकांना पुरेल इतके शिजवलेले जेवण वाटण्यात येणार आहे. (Raj Bhaven to give food packets to 100 homeless persons per week)

राज्यातील गरिबांना खायला अन्न मिळावे. त्यांची होणारी परवड थांबावी यासाठी स्ट्रीट प्रोव्हिडन्स ही संस्था काम करते. त्यांनी यासाठी फूड बँके सुरू केली असून यातून पोलिस ठाण्यांसह विविध ठिकाणी अन्न साठविण्यासाठी फ्रीज (Fridge) बसवले जातील. जेथे अतिरिक्त शिजवलेले अन्न स्विकारले जाईल आणि साठवले जाईल. हे अन्न (Food)पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील गरिब आणि बेघरांना वाटले जाईल. तर सध्या १५ पोलिस (Police) ठाण्यांसोबतच दोन पेट्रोल पंप, दोन निवारागृहे आणि सांगोल्‍डा येथील मुख्यालयातही (Headquarter) फ्रीज बसवले जात आहेत.

तसेच स्ट्रीट प्रोव्हिडन्सचे संस्थापक डोनाल्ड फर्नांडिस यांनी, असेच एक राज्यपालांकडे राजभवन येथील मुख्य गेटजवळ लावण्याची विनंती केली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव याला परवानगी देण्यात आली नाही, असे सांगितले. पण आमच्या या उपक्रमाला पाठींबा देत राज्यापाल (Governor) दिला. त्यांनी राजभवनमधून (Rajbhavan) आठवड्यातून एकदा 100 बेघर लोकांना एकदा ताजे शिजवलेले जेवण दिले जाईल असे सांगितल्याची माहितीही फर्नांडिस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT