Raj Bhavan Goa Dainik Gomantak
गोवा

घटक राज्‍यदिनी नव्या राजभवनाची पायाभरणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद राहणार उपस्‍थित

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्‍याच्‍या घटकराज्‍य दिनाचे औचित्‍य साधून दि. 30 मे रोजी नवीन राजभवनच्‍या इमारतीचा पायाभरणी सोहळा होणार आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्‍थिती राहिल. सोहळ्यात आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांसह राज्‍यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलल्‍या 30 मान्‍यवरांचा सत्‍कार करण्यात येणार असल्‍याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्‍या पणजी येथील सरकारी निवासस्‍थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजभवनच्‍या परिसरात ही भव्‍य वास्‍तू उभारण्यात येणार आहे. नवीन राजभवनचे बांधकाम पूर्ण झाल्‍यानंतर सध्याचे राजभवन जनतेला पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार असल्‍याचे ते म्हणाले. तसेच उटा संघटनेच्‍या बाळ्ळी येथील आंदोलनात बळी गेलेले मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप या तरुणांना आदरांजली वाहण्यासाठी आदिवासी कल्याण संचालनालयाच्‍या वतीने दि. 25 मे रोजी प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शिक्षण, संस्‍कृती, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात काम केलेल्‍या आदिवासी समाजातील चौघांना गौरविण्यात येईल असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

25 मे रोजी प्रेरणा दिनानिमित्त कृषी क्षेत्रातील रोहिदास मडकईकर, सातू वेळीप (शिक्षण), गोविंद शिरोडकर (संस्‍कृती) व प्रतिक्षा गावकर (क्रीडा) यांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्‍काराने सन्मानित केले जाणार आहे. पणजीतील मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे आदी मान्‍यवर उपस्‍थित राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

AAP Goa: आतिशींकडे पुन्हा राज्य प्रभारीपद, आम आदमी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT