Gokulwadi Drain Flood Dainik Gomantak
गोवा

Gokulwadi Drain Issue: केरकचरा, झाडेझुडपांमुळे नाला तुंबून गोकुळवाडीत पाणीच पाणी

Gokulwadi Drain Problem: नगराध्यक्षांनी तातडीने या नाल्याच्या साफसफाईचे निर्देश दिले; तसेच दोन ठिकाणी वाहून गेलेल्या रस्त्याची डागडुजी करण्याची सूचना केली

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: येथील देसाईनगर भागातून वाहणारा नाला तुंबून पावसाचे पाणी बाहेर फुटल्याने सोमवारी गोकुळवाडी भागात हाहाकार माजला होता. मंगळवारी सकाळी नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी या भागाची पाहणी केली असता या नाल्यात केरकचरा, कापलेली झाडेझुडपे, माडांची झावळे आदी टाकण्यात आल्याने नाला तुंबल्याचे निदर्शनास आले. याबाबत नगराध्यक्षांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, नगराध्यक्षांनी तातडीने या नाल्याच्या साफसफाईचे निर्देश दिले. तसेच देसाईनगर येथे दोन ठिकाणी वाहून गेलेल्या रस्त्याचीही डागडुजी करण्याची सूचना केली आहे.

सोमवारी दुपारी तासभर पडलेल्या जोरदार पावसामुळे गोकुळवाडी येथे नाला तुंबून पाणी बाहेर फुटले होते, त्यामुळे मुख्य रस्त्यावरून पाण्याचा लोट वाहून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच पाच दुकानांमध्ये चिखलमाती घुसल्याने नुकसान झाले. या पाण्याच्या लोटामुळे देसाईनगर येथे जाणाऱ्या रस्त्याची धडा दोन ठिकाणी कोसळून रस्ता असुरक्षित झाला आहे.

तसेच रस्त्यावर सर्वत्र दगड माती साचल्याने वाहतुकीसाठी असुरक्षित झाले होते. पाणी ओसरल्यानंतर या नाल्यात मोठ्या प्रमाणात माती दगड, कापलेली झाडे व कचरा साचल्याचे निदर्शनास आले. तसेच रस्त्याजवळ नाल्याचे तोंड केरकचऱ्याने भरल्याने पाण्याचे लोट रस्त्यावरून वाहू लागला. त्यामुळे या परिसरात पूरसदृस्य स्थिती निर्माण झाली. या भागात प्रथमच असा प्रकार घडला.

पालिकेने याची दखल घेत नगराध्यक्ष प्रभू यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व नगरसेवक दयानंद बोर्येकर यांच्या समवेत या भागाची पाहणी केली. यावेळी नाल्यात मोठ्या प्रमाणात केरकचरा, झाडेझुडपे, झावळे आदी साठलेले दिसून आले. प्रभू यांनी हा नाला त्वरित साफ करण्याची सूचना केली. तसेच वाहून गेलेला रस्ताही पूर्वपदावर आणण्याची सूचना केली. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कचरा, झाडेझुडपे नाल्यात टाकू नका : नगराध्यक्षा

साखळी पालिका स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. मॉन्सूनपूर्व कामेही योग्यपणे झालेली आहेत. मात्र काही लोक नाला तसेच गटारांत कचरा, झावळे, कापलेली झाडेझुडपे आदी टाकतात, त्यामुळे कचरा तुंबून नाला भरतो व पाण्याची नैसर्गिक वाट अडवली जाते. परिणामी पूरस्थिती ओढवते. नागरिकांनी जबाबदारीने वागताना कचऱ्याबरोबरच कापलेली झाडे, माडांची झावळे पालिकेकडे द्यावीत, असे आवाहन नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: फोंड्यात बाल विवाहाचा प्रकार उघडकीस

Goa Crime: टॅक्सीचालकाने केले अल्पवयीन मुलीशी लग्न; घरी गेल्यावर उलगडला खरा प्रकार, कर्नाटकातील तरुणाच्या आवळल्या मुसक्या

'ही धूळफेक ठरू नये...'; निवड आयोगाकडून भरतीच्या निर्णयावर चोडणकर, बोरकरांनी सुनावले खडे बोल

C K Nayudu Trophy: गोव्यावर फॉलोऑनची नामुष्की! अझान, देवनकुमारची शतकी सलामी

'सहकार क्षेत्रातील बँकांनी तयार रहावे..'; एनपीए वाढ, डबघाईवरुन मंंत्री शिरोडकरांनी दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT