Rain Update : सुवासिनींच्या आनंदावर विरजण! दिवजोत्सवावर पावसाचा परिणाम? Dainik Gomantak
गोवा

सुवासिनींच्या आनंदावर विरजण! दिवजोत्सवावर पावसाचा परिणाम?

सर्वत्र दिवजोत्सवाची धामधूम सुरू असतानाच पावसाने कहर केला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिसेंबर महिना सुरू होऊनही पाऊस अजूनही परतण्याचे नाव घेत नसल्याने डिचोलीत (Bicholim) जनजीवनावर परिणाम झाला. विजेचा लखलखाट, मेघगर्जना झाली नसली पावसामुळे (Rain Update) जनतेची तारांबळ उडाली. दुसऱ्या बाजूला सर्वत्र दिवजोत्सवाची धामधूम सुरू असतानाच पावसाने कहर केल्याने डिचोलीतील बहुतेक भागातील सुवासिनींमध्ये निराशा पसरली आहे.

बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी पुन्हा जोरदार पाऊस(Rain) झाल्‍याने व्यावसायिक व नागरिकांची धांदल उडाली. रस्त्याच्या बाजूने पाणी साचले होते. विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला. पावसामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.

सुवासिनींच्या आनंदाला उधाण...

डिचोली तालुक्यात सर्वत्र सुवासिनींच्या आनंदाला उधाण देणाऱ्या दिवजोत्सवाची धामधूम सुरू आहे. बहूतेक भागात शुक्रवारी हा उत्सव साजरा होणार आहे. मात्र, बुधवारपासून पडणाऱ्या जोरदार पावसात सुवासिनींच्या आनंदावर विरजण पडले आहे. दिवजोत्सवावेळी तरी वरुणराजाने कृपा करावी, असे साकडे सुवासिनींसह भाविक घालत आहेत.

विद्यार्थ्यांची तारांबळ

शाळांचे वर्ग सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. आज (गुरुवारी) शाळा सुटण्याच्या वेळेतच जोरदार पाऊस पडत राहिल्याने विद्यार्थ्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी बसस्थानकाचा आसरा घेतला.

झेंडू, शेवंती, लहान गुलाब महागला

कर्नाटक, महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणाहून झेंडू, शेवंती, लहान गुलाब या ठराविक फुलांची आवक होत असते. दिवजोत्सवामुळे सध्या फुलांना मागणी आहे. एकाबाजूने पावसाचा कहर सुरू असला, तरी आज (गुरुवारी) बाजारात सुवासिनींकडून फुलांची खरेदी सुरु होती. तुटवड्यामुळे फुले महाग झाली आहेत. सफेद शेवंती आणि लहान गुलाब २५० ते ३०० रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. लांब देठाची शेवंती मात्र ४०० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. या फुलांना अधिक मागणी असते. पावसाने कृपा केल्यास बाजारात फुलांची आवक वाढून खरेदीला जोर येण्याची शक्यता आहे. अवेळी पडणाऱ्या पावसामुळे पेडणे तालुक्यातील जनजीवनावर परिणाम झाला. बुधवारी रात्रीपासून जोरदार वारा, कडाडणाऱ्या विजांसह मोठा पाऊस झाला. गुरुवार हा पेडण्याचा बाजाराचा दिवस असल्याने पावसामुळे परिणाम झाला. परिणामी ग्राहकांअभावी शुकशुकाट होता.

शेतकऱ्यांनी अंगणात भात, धान्य आदी वाळत घातले होते. हे गोळा करताना शेतकऱ्यांची बरीच धांदल उडाली. त्यातच वारंवार वीज खंडित होण्याचा प्रकारामुळे गैरसोयी भर पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT