बुधवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे (Rain) दहन चुकल्याने आजही अधिराज्य गाजवणारे नरकासुर (Narakasur)   संतोष गोवेकर
गोवा

गोव्यात नरकासुर दहनावर पावसाचे पाणी

बुधवारी रात्री अचानक पडलेल्या जोरदार पावसात महिनाभर राबून तयार केलेल्या नरकासुर प्रतिमा (Narakasur image) नेमक्या दहन करतेवेळीच ओल्याचिंब झाल्या आणि देव सोडून नरकासुराचा अर्थातच वाईटाचा उदोउदो करणाऱ्यांना त्या जशाच्या तशा रस्त्यातच सोडून तेथून पळ काढावा लागला.

दैनिक गोमन्तक

शिवोली: नियतीला मान्य नसलेल्या गोष्टी आपण जेव्हा जोर जबरदस्तीने पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचे परिणाम हमात्र वेगळेच दिसून येतात या गोष्टीचा प्रत्यय बार्देशातील गावागावांत अर्धवट जळून जागोजागी उभ्या केलेल्या नरकासुर प्रतिमा (Narakasur image) पाहिल्यानंतर दिसून येते. दिपावलीच्या निमित्ताने गोव्यातील (Goa) बहुतांश शहरे तसेच गांवोगावी नरकासुर प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे.

शास्त्राला धरुनच असलेल्या या प्रथेप्रमाणे तसे करणे जरी योग्य असले तरी हल्लीच्या काळात या प्रथेचे जागोजागी मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या बार्देशचाच विचार केल्यास यंदा म्हणे या भागातील धनाढ्य राजकारण्यांनी गल्लीबोळातील नरकासुर प्रतीमासाठी प्रत्येक गटासाठी किमान पंचवीस हजार रुपयांच्या देणग्या दिल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. परंतु, कसचे काय ? मराठीत एक म्हण आहे, आले देवाजीच्या मनां तेथे कुणाचेच चालेना.

बुधवारी रात्री अचानक पडलेल्या जोरदार पावसात महिनाभर राबून तयार केलेल्या नरकासुर प्रतिमा नेमक्या दहन करतेवेळीच ओल्याचिंब झाल्या आणि देव सोडून नरकासुराचा अर्थातच वाईटाचा उदोउदो करणाऱ्यांना त्या जशाच्या तशा रस्त्यातच सोडून तेथून पळ काढावा लागला. दरम्यान, यानिमित्ताने पणजी म्हापसासारख्या बड्या शहरात आयोजित नरकासुर स्पर्धाही रद्द करण्यात आल्याची माहिती मिळात आहे.

दरम्यान, नरकासुर स्पर्धेसाठी मोठमोठ्या देणग्या दिलेल्या बार्देशातील बहुतेक राजकारण्यांना नकासुर दहनापेक्षा त्यानिमित्ताने लोकांसमोर प्रचाराचे भाषण करण्याची संधी हुकल्याचे अधिक दुख झाल्याची चर्चा ऐकुं येत होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

Bicholim Crime: खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर कारमध्ये अत्याचार; 47 वर्षीय आरोपीला अटक

Dodamarg: 20 फूट खोल ओहोळात कोसळलेली कार, दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; चालक सुदैवानं बचावला

SCROLL FOR NEXT