Railway Flyover in Madgaon Dainik Gomantak
गोवा

मडगावात कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

दुरुस्ती कामामुळे मडगाव शहरात वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली आहे. हा उड्डाणपूल बांधून जवळ जवळ दोन दशके पूर्ण झाली असली तरी त्याची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. पण आता उड्डाण पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती. दुरुस्ती कामास सुरुवात झाली असली तरीही पूल वाहतुकीस पुर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु असून एका बाजूने वाहनांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Railway Flyover in Madgaon News Updates)

उड्डाणपुलाच्या दुरुस्ती (Repair) कामामुळे मडगाव शहरात वाहतुकीचा खोळंबा लोकांना काही दिवस त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पुलावरील जे रबर जोड निकामी झाले आहेत, ते बदलण्याचे काम सर्वात आधी हातात घेतले जाईल, शिवाय रस्त्याचे डांबरीकरणही होणार आहे. दुरुस्ती काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि 31 मार्चपासून वाहतूक (Traffic) पूर्णपणे उड्डाणपुलावरुन सुरळीत सुरु केली जाईल.

पुलाच्या दुरुस्तीचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येत असून या उड्डाणपुलाव्यतिरिक्त माशे आणि अर्दफोंड येथील उड्डाणपुलांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी खात्याने 5.99 कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गेल्या काही वर्षांपासून या उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम अपेक्षित होते. रस्त्याखालील स्टील आणि लोखंडाचे गज, सळई वर आले होते. वाहनांसाठी ते धोकादायक ठरत होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील (Road) दिवेही कधी कधी बंद असत, त्यावेळी चालकांना तसेच पुलावरुन चालणाऱ्यांना त्रास होत होता. काही वर्षांपूर्वी या उड्डाणपुलावर काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली होती. तरी ती अपुरी होती. 31 मार्च पर्यंत काम पुर्ण केले जाईल यांत रंगरंगोटीचा समावेश असेल असे तेथील अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT